millions under lockdown in China : कोरोना संकट, चीनमध्ये पुन्हा झाले लॉकडाऊन

millions under lockdown in China after COVID19 outbreak in Xi'an city : चीनमधील झिआन शहरात एका दिवसात कोरोनाचे ५२ रुग्ण आढळले. आतापर्यंत झिआन शहरात १४३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना संकट वाढू लागताच चीनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश देण्यात आला.

millions under lockdown in China after COVID19 outbreak in Xi'an city
कोरोना संकट, चीनमध्ये पुन्हा झाले लॉकडाऊन 
थोडं पण कामाचं
 • कोरोना संकट, चीनमध्ये पुन्हा झाले लॉकडाऊन
 • चीनमधील झिआन शहरात एका दिवसात कोरोनाचे ५२ रुग्ण आढळले
 • चीनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश

millions under lockdown in China after COVID19 outbreak in Xi'an city : झिआन : कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमधील वुहान प्रांतात आढळला. यानंतर काही महिन्यांताच कोरोना संकट जगभर पसरले. आता चीनमधील झिआन शहरात एका दिवसात कोरोनाचे ५२ रुग्ण आढळले. आतापर्यंत झिआन शहरात १४३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना संकट वाढू लागताच चीनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश देण्यात आला. लक्षावधी नागरिक सध्या आपापल्या घरांमध्ये थांबले आहेत. 

कोविड१९ हा कोरोना विषाणू आणि त्याचा ओमायक्रॉन नावाचा नवा अवतार या दोन्ही विषाणूंमुळे कोरोना संकट वेगाने पसरत आहे. आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाईल; असा स्पष्ट इशारा चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिला आहे. नागरिकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि लॉकडाऊन संपेपर्यंत घरात राहा; असा सल्लावजा आदेश प्रशासनाने दिला आहे. 

प्रशासनाच्या नियमानुसार लॉकडाऊन काळात प्रत्येक घरातून फक्त एकच व्यक्ती घराबाहेर पडून गरजेच्या वस्तूंची खरेदी करू शकते. इतरांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे.

चीनमधील झोजियांग प्रांतात कोरोना संकट वेगाने पसरत आहे. या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने ७० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. संपूर्ण प्रांतात लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू झाले आहेत. यामुळे चिनी निर्यातीचे प्रमुख केंद्र असलेल्या झोजियांग प्रांतातील अर्थचक्र पुरते कोलमडले आहे. 

चीन सरकारने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत १ लाख ५४४ कोरोना रुग्ण आढळले. यापैकी ९४ हजार १४३ जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ हजार ६३६ मृत्यू झाले. चीनमध्ये १ हजार ७८५ जण अद्याप कोरोना अॅक्टिव्ह आहेत.

चीन सरकारच्या आकडेवारीवर जगातील बहुसंख्य देशांचा विश्वास नाही. पण चीन सरकारने दिलेली ही आकडेवारीच देशातील कोरोना संकट संपले नसल्याचा मोठा पुरावा आहे.

सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असलेले देश

 1. अमेरिका - १ कोटी ६ लाख २१ हजार ६२६
 2. इंग्लंड - १५ लाख २१ हजार ६१२
 3. फ्रान्स - ९ लाख ८८ हजार ६४२
 4. रशिया - ८ लाख ९५ हजार १९३
 5. जर्मनी - ८ लाख ३८ हजार ४७१
 6. नेदरलंड - ५ लाख ५९ हजार १७५
 7. स्पेन - ५ लाख ४ हजार २९७
 8. बेल्जियम - ४ लाख ३५ हजार ५५७
 9. पोलंड - ४ लाख २३ हजार ८९
 10. व्हिएतनाम - ३ लाख ८४ हजार ६००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी