Ajay Mishra : पागल है का बे? पत्रकारांना मारायला धावले केंद्रीय मंत्री, लखीमपूर हिंसाचारबाबत विचारला होता प्रश्न

लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी पत्रकारांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना प्रश्न विचारला. तेव्हा मिश्रा चांगलेच भडकले, त्यांनी पत्रकरांना शिव्या घातल्या इतकेच नाही तर पत्रकारांना मारण्यासाठी ते त्यांच्या अंगावर धावून गेले. minister of home state ajay mishra teni angry on media lakhimpur

ajay mishra
जय मिश्रा टेनी 
थोडं पण कामाचं
  • लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी पत्रकारांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना प्रश्न विचारला
  • मिश्रा चांगलेच भडकले, त्यांनी पत्रकरांना शिव्या घातल्या
  • पत्रकारांना मारण्यासाठी ते त्यांच्या अंगावर धावून गेले

Ajay Mishra : लखनौ : लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी पत्रकारांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना प्रश्न विचारला. तेव्हा मिश्रा चांगलेच भडकले, त्यांनी पत्रकरांना शिव्या घातल्या इतकेच नाही तर पत्रकारांना मारण्यासाठी ते त्यांच्या अंगावर धावून गेले. उपस्थित लोकांनी त्यांना आवरले. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विरोधी पक्षांनी मिश्रा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी केली आहे. (minister of home state ajay mishra teni angry on media lakhimpur)


उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये केंद्रीय गृहराज्य मंत्री जय मिश्रा टेनी हे एका ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनासाठी आले होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांना त्यांच्या मुलगा आशिष मिश्रा लखीमपूर हिंसाचार प्रकरणी प्रश्न विचारला तेव्हा मंत्रीमहोदय चांगलेच भडकले. त्यांनी पत्रकारांना शिव्या घातल्या. एका निर्दोष माणसला अडकवता, लाज नाही वाटत, किती घाणेरडे लोक आहात, हे एक हॉस्पिटल आहे तुम्हाला दिसत नाही असे रागाच्या भरात ते पत्रकारांना म्हणाले. त्यांनी पत्रकारांना शिव्याही घातल्या. तसेच मारण्यासाठी अंगावर धावूनही गेले. परंतु उपस्थित लोकांनी त्यांना अडवले. 

राजीनामा द्या

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी विरोधी पक्षांनी मिश्रा यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी केली होती. मिश्रा आपल्याला कायद्यापेक्षा मोठे समजतात त्यांचा राजीनामा घेतल्यानंतरच आपण शांत बसणार असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. 

टेनी को बर्खास्त करो, ट्विटरवर ट्रेंड
टेनी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे टेनी यांना मंत्रिमंडळातून काढून टाका असा ट्विटरवर ट्रेंड सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी