प्रसारण मंत्रालयाची कारवाई; 8 YouTube चॅनेल ब्लॉक, राष्ट्रविरोधी खोट्या बातम्या प्रसारीत केल्याचा ठपका

भारताच्या (India) सुरक्षेवर परिणाम करणारा मजकूर पोस्ट (Post) केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Broadcasting) 8 YouTube चॅनेलवर बंदी घातली आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा (National Security), कायदा आणि सुव्यवस्था  (Law and Order) आणि परराष्ट्र संबंधांवर (foreign relations) परिणाम करणारी सामग्री दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या चॅनलमध्ये एक पाकिस्तानी यूट्यूब चॅनलही आहे. त्याला 118 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. 

 Action by Ministry of Broadcasting; 8 Block YouTube channels
प्रसारण मंत्रालयाची कारवाई; 8 YouTube चॅनेल ब्लॉक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 21 डिसेंबरपासून 102 YouTube चॅनेल ब्लॉक करण्यात आली आहेत.
  • IT नियम 2021 अंतर्गत 7 भारतीय आणि 1 पाकिस्तानस्थित YouTube चॅनल ब्लॉक करण्यात आले आहे.
  • भारताची सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित फेक न्यूज दिल्याप्रकरणी कारवाई

नवी दिल्ली  : भारताच्या (India) सुरक्षेवर परिणाम करणारा मजकूर पोस्ट (Post) केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Broadcasting) 8 YouTube चॅनेलवर बंदी घातली आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा (National Security), कायदा आणि सुव्यवस्था  (Law and Order) आणि परराष्ट्र संबंधांवर (foreign relations) परिणाम करणारी सामग्री दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या चॅनलमध्ये एक पाकिस्तानी यूट्यूब चॅनलही आहे. त्याला 118 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताची सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित फेक न्यूज प्रचार प्रसार करण्यासाठी ही 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. दरम्यान 21 डिसेंबरपासून 102 YouTube चॅनेल ब्लॉक करण्यात आली आहेत. IT नियम 2021 अंतर्गत 7 भारतीय आणि 1 पाकिस्तानस्थित YouTube चॅनल ब्लॉक करण्यात आले आहे.

या चॅनल्सवर भारताविरोधात बनावट मजकूर पसरवल्याचा आरोप आहे. भारताविरोधी खोट्या बातम्या (Fake News) प्रसारीत करुन या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून पैसे कमावले जात होते, असा ठपका ठेवत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. याआधीही अशाच प्रकारे युट्युबवरुन खोट्या बातम्या आणि माहिती पसरवणाऱ्या युट्युब चॅनेलवर कारवाई करण्यात आली होती.

Read Also : Maharashtra Rain : मुंबई, पुण्यात पावसाचा येलो अलर्ट

News Ki Duniya (न्यूज की दुनिया) हे न्यूज चॅनेल पाकिस्तानमधून चालवलं जात होतं. या चॅनेलला 97 हजार लोकांनी सबस्क्राईब केलेलं होतं. राष्ट्रविरोधी खोट्या बातम्या पसरवणं, भारतीय संस्कृतीवर आक्षेपार्ह कंटेन्ट प्रसारीत करणं, असा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. यात भारतीय सैन्यासोबत, जम्मू काश्मीर आणि भारतीय सरकारविरोधात चुकीच्या गोष्टी प्रसारीत केल्याचं तपासात दिसून आले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.

Read Also : फडणवीसांच्या भेटीसाठी मोहित कंबोज आणि रश्मी शुक्ला ‘सागर’वर

बॅन केलेल्या चॅनल्समध्ये कुणाकुणाचा समावेश

लोकतंत्र टीव्ही –
यू एन्ड ए टीव्ही
ए एम रझवी
गौरवशाली पवन मिथिलांचल
सी टॉप पाईव्ह टीएच
सरकारी अपडेट
सब कुछ देखो
न्यूज की दुनिया

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी