कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, व्हिडिओ केला व्हायरल

कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीला ब्लॅकमेल करुन आरोपी वर्षभर करत होते बलात्कार 

minor girl rape after intoxicating her with sedatives mixed in cold drink
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार, आरोपींनी बनवला व्हिडिओ 
  • आरोपी वर्षभर करत होते तरुणीचं लैंगिक शोषण
  • पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक  

नवी दिल्ली: उत्तरप्रदेशातील नोएडा येथे एका अल्पवयीन मुलीवर वर्षभर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडित मुलीवर वर्षभर केला बलात्कार. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाने गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांची नावे चांद उर्फ मुरस्लीन आणि शान उर्फ सोनू अशी आहेत. 

आरोपींनी व्हिडिओ केला व्हायरल 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत एका भाड्याच्या घरात राहते. आरोपी मुरस्लीन याने वर्षभरापूर्वी कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून पीडितेला दिलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तर मुरस्लीन याचा मित्र सोनू याने घटनेचा व्हिडिओ बनवला. यानंतर आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर पीडित मुलीचं लैंगिक शोषण केलं. लॉकडाऊन दरम्यान पीडित मुलगी आपल्या गावी गेली. याच दरम्यान आरोपींनी पीडित मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला.

कुटुंबाला मारण्याची धमकी 

पीडित मुलीने ज्यावेळी आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचं म्हटलं त्यावेळी तिला आणि तिच्या कुटुंबाला आरोपींनी मारण्याची धमकी दिली. मात्र, या धमकीला पीडित मुलीचे कुटुंबीय घाबरले नाहीत आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली आणि दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

भावाने तीन मित्रांसोबत मिळून केला बलात्कार 

बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना जयपूर येथे काही दिवसांपूर्वी घडली आहे. एका भावाने आपल्या तीन मित्रांसह बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर या भावाने बलात्कार केल्यावर आपल्या बहिणीची हत्या देखील केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी