उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलिया (Baliya) जिल्ह्यातील एका गावातून मागच्या सोमवारी एका अल्पवयीन मुलीवर (minor girl) बलात्कार (rape) झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. तिच्या कुटुंबियांनी (family members) तक्रार (complaint) दाखल केल्यानंतर पोलिसांनी (police) मंगळवारी दोन्ही संशयितांना ताब्यात (accused arrested) घेतले आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की दोन युवकांनी त्यांच्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध (forceful physical relations) ठेवून त्याचा व्हिडिओ (video) तयार केला आणि तो दाखवून तिच्याशी पुन्हा संबंध ठेवण्याचा आणि बळजबरीने तिचे धर्मपरिवर्तन (religious conversion) करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
बलिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. विपिन ताडा यांनी सांगितले की कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करताना दोन्ही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्थानिक कोतवाली पोलीसस्थाकाचे स्टेशन हाऊस अधिकारी विपिन सिंह यांनी सांगितले की संशयितांच्या कुटुंबियांनी या मुलीला विवाहासाठी धर्मपरिवर्तन करण्याची धमकी दिली होती ज्यानंतर धर्मपरिवर्तन कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
एएसपी कुमार यांनी सांगितले, “11 जानेवारी रोजी या युवकाने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने या बलात्काराची व्हिडिओ क्लिप तयार केली आणि ती क्लिप दाखवून मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला.”
संशयित आरोपींच्या या वर्तणुकीमुळे त्रस्त होऊन सदर मुलीने गेल्या 13 जानेवारी रोजी आपल्या आईवडिलांना झाल्या प्रकाराची संपूर्ण माहिती दिली. यानंतर 25 जानेवारी रोजी पीडितेच्या वडिलांनी बलिया पोलीसस्थानकात संपर्क करून याच प्रकरणाची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी कलम 452, 376 आणि पीडिता अल्पवयीन असल्याने लैंगिक शोषणापासून अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यासाठीच्या पॉक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल करून घेतली आणि मंगळवारी दोन्ही संशयित आरोपी म्हणजेच सदर युवक आणि त्याच्या वडिलांना अटक केली.