'मिसेज श्रीलंका' स्पर्धेत विजेतीचा लाईव्ह कार्यक्रमात सगळ्यांसमोर अपमान

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 07, 2021 | 14:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

पुष्पिका डिसिल्वाला मिसेज श्रीलंका या खिताबाने गौरवण्यात आले. या घोषणेनंतर मंचावर तिला रनरअपसह विजेतीचा ताज घालण्यात आला. यानंंतर यावर २०१९ची विजेती कॅरोलिन जूरी तेथे आली. 

miss srilanka
'मिसेज श्रीलंका' स्पर्धेत विजेतीचा लाईव्ह कार्यक्रमात अपमान 

थोडं पण कामाचं

  • पुष्पिका डिसिल्वाला मिसेज श्रीलंका या किताबाने गौरवण्यात आले
  • रविवारी लाईव्ह शो सुरू असताना मंचावर घडलेल्या या घटनेने साऱ्यांनाच हैराण केले.
  • मंचावर आपल्यासोबत झालेल्या अपमानाबाबत ती कायदेशीर कारवाई करणार आहे.

कोलंबो: मिसेज श्रीलंका  सौंदर्यवती स्पर्धेदरम्यान हैराण करणारी घटना पाहायला मिळाली. २०१९च्या विजेतीने सगळ्यांसमोर या स्पर्धेच्या विजेतीच्या डोक्यावरा ताज काढून रनरअपला घातला. डोक्यावरून हा ताज उतरवताना विजेती पुष्पिका डिसिल्व्हाच्या डोक्याला दुखापत झाली यानंतर तिला रुग्णालयात न्यावे लागले. रविवारी लाईव्ह शो सुरू असताना मंचावर घडलेल्या या घटनेने साऱ्यांनाच हैराण केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

२०१९च्या विनरने काढून घेतला ताज

खरंतर, पुष्पिका डिसिल्वाला मिसेज श्रीलंका या किताबाने गौरवण्यात आले. या घोषणेनंतर मंचावर तिला रनरअपसोबत विजेतीचा ताज घालण्यात आला. यानंतर मंचावर २०१९ची विजेती कॅरोलिन जूरी तेथे आली आणि तिने डिसिल्वाच्या डोक्यावरून ताज काढून गेतला. जूराने सांगितले की डिसिल्वा घटस्फोटित महिला आहे. तिला या स्पर्धेची विजेती घोषित करणे चुकीचे आहे. जुरीने डिसिल्वाच्या डोक्यावरून जेव्हा ताज उतरवला तेव्हा तिचे केस खेचले गेले. यानंतर डिसिल्वा रडत रडत मंचावरून उतरली. 

ताज रनरअपला दिला

जुरीने तेथील उपस्थित लोकांना सांगितले, स्पर्धेच्या नियमानुसार घटस्फोटित महिला या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. यासाठी तिचा या खिताबावर अधिकार नाही. या ताजवर दुसऱ्या स्थानावरील महिलेचा अधिकार आहे. सौंदर्य स्पर्धेत आयोजकांनी जेव्हा ज्युरीच्या दाव्याचा तपास केला तेव्हा आढळले की डिसिल्वाने आतापर्यंत घटस्फोट घेतलेला नाही. यानंतर आयोजकांनी डिसिल्वाची माफी मागितली. 

कायदेशीर कारवाई करणार डिसिल्वा

डिसिल्वा आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. मात्र तिने अद्याप घटस्फोट घेतलेला नाही. मंचावर आपल्यासोबत झालेल्या अपमानाबाबत ती कायदेशीर कारवाई करणार आहे. आपल्या फेसबुक पोस्टवर तिने सांगितले की या घटनेनंतर ती रूग्णालयात गेली आणि आपली जखम डॉक्टरांना दाखवली. तिने लिहिले, माझा अजून घटस्फोट झालेला नाही. खऱ्या अर्थाने क्वीन ती नसते जी एखाद्या महिलेच्या डोक्यावरून ताज उतरवत असेल तर खरी क्वीन ती असते जी गुपचूप दुसऱ्या महिलेच्या डोक्यावर ताज ठेवेल. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी