Miss Universe 2021: तब्बल 21 वर्षांनी मिस युनिव्हर्सचा ताज भारताकडे; हरनाझ संधूने जिंकला मिस युनिव्हर्स 2021 चा crown

Miss Universe 2021:  इस्रायल(Israel) मधील इलात येथे झालेल्या 70 व्या मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) मध्ये  भारताने क्राउन (Crown) जिंकलं आहे. रनाझ संधूने पराग्वे आणि दक्षिण आफ्रिका या स्पर्धकांना मागे टाकून मुकुट जिंकला.

India's Harnaj Sandhu wins Miss Universe 2021 crown
भारताच्या हरनाज संधूने जिंकला मिस युनिव्हर्स 2021 चा crown  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती मॉडेल आहे.
  • हरनाझने पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

Miss Universe 2021:  नवी दिल्ली : इस्रायल(Israel) मधील इलात येथे झालेल्या 70 व्या मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) मध्ये  भारताने क्राउन (Crown) जिंकला आहे. हरनाझ संधूने पराग्वे आणि दक्षिण आफ्रिका या स्पर्धकांना मागे टाकून आपल्या डोक्यावर  मुकुट सजवला. भारताकडून 2000 मध्ये लारा दत्ताने विजेतेपद जिंकला होता, म्हणजेच तब्बल 21 वर्षांनी भारताने हा ताज पटकावला आहे. यामुळे  संपूर्ण भारतीयांसाठी हा गर्वाचा क्षण आहे. जागतिक स्तरावर थेट प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमात संधूला मेक्सिकोच्या माजी मिस युनिव्हर्स 2020च्या अँड्रिया मेझा यांनी मुकुट प्रदान केला. प्रथम आणि द्वितीय उपविजेते अनुक्रमे पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिका होते. पहिल्या तीन फेरीचा एक भाग म्हणून, स्पर्धकांना प्रश्न विचारण्यात आला होता की, " आजच्या काळात तरुण महिलांना येणाऱ्या दबावांना कसे सामोरे गेले पाहिजे, याविषयी तुम्ही काय सल्ला द्याल"

यावर हरनाझ म्हणाली, “आजच्या तरुणाईला सर्वात मोठा दबाव म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. आपण अद्वितीय आहात हे जाणून घेणे आपल्याला सुंदर बनवते. इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोला. बाहेर या, स्वतःसाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात. तू तुझाच आवाज आहेस. माझा स्वतःवर विश्वास आहे आणि म्हणूनच मी आज इथे उभा आहे." तिच्या दमदार उत्तरानंतर सौंदर्याने टॉप 3 मध्ये स्थान मिळवले.

टॉप 5 मध्ये तिला विचारण्यात आले होते "बर्‍याच लोकांना हवामान बदल ही फसवी वाटते, अन्यथा तुम्ही त्यांना पटवून देण्यासाठी काय कराल?" हरनाझने सर्वांना प्रभावित केले जेव्हा ती म्हणाली, "निसर्ग अनेक समस्यांमधून कसा जात आहे हे पाहून माझे हृदय तुटते आणि हे सर्व आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे होतं. मला असे वाटते की कृती करण्याची आणि कमी बोलण्याची हीच वेळ आहे. कारण तुमची प्रत्येक कृती निसर्ग वाचवू शकते किंवा नष्ट करू शकते. पश्चात्ताप आणि दुरुस्ती करण्यापेक्षा प्रतिबंध आणि संरक्षण करणे चांगले आहे आणि आज मी तुम्हाला हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.”

कोण आहे हरनाझ संधू?

हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती मॉडेल आहे. हरनाझने पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी सिनेमांमध्ये झळकली आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर् करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे. हरनाझने 2017 मध्ये टाइम्स फ्रेश फेससह तिच्या सौंदर्य स्पर्धेच्या प्रवासाला सुरुवात केली. तिच्याकडे फेमिना मिस इंडिया पंजाब 2019 सारखी अनेक स्पर्धा खिताब देखील आहेत. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी