IAF AN-32: हवाई दलाचे एएन-३२ विमान अपघातग्रस्त; अरूणाचल प्रदेशमध्ये सापडले अवशेष

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 11, 2019 | 17:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

IAF AN-32: अरूणाचल प्रदेशमध्ये सियांग जिल्ह्यात लीपो येथून १६ किलोमीटर अंतरावर एएन-३२ विमानाचे अवशेष सापडले. हवाई दलाच्या एमआय १७ या विमानाच्या मदतीने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यास मदत झाल्याचे सांगण्यात आले.

IAF AN-32
हवाई दलाच्या एएन-३२ विमानाचे सापडले अवशेष  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : गेल्या आठ दिवसांपासून अरूणाचल प्रदेशमध्ये बेपत्ता झालेले भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान सापडले आहे. या विमानाचा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले असून, कोसळलेल्या विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती आहे. अरूणाचल प्रदेशमध्ये सियांग जिल्ह्यात लीपो येथून १६ किलोमीटर अंतरावर विमानाचे अवशेष सापडले आहेत. हवाई दलाच्या एमआय १७ या विमानाच्या मदतीने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यास मदत झाल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष १२ हजार फूट उंचीवर सापडल्याची माहिती आहे. या विमानात हवाई दलाचे १३ जण होते. त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. या विमानाने आसाममधील जोरहाट एअरबेसवरून उड्डाण केले होते. त्यानंतर तासाभरातच त्या विमानाचा संपर्क तुटला होता. गेल्या आठ दिवसांपासून या विमानाचा शोध सुरू होता.

इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत

गेल्या आठ दिवसांत एएन-३२ विमानाचा शोध युद्धपातळीवर घेतला जात होता. पण, पण खराब हवामानामुळे शोध कार्यात अडथळे येत असल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले होते. विमानात एकूण १३ जण होते. विमानातील सर्व प्रवाशांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले. एएन-३२ हे रशियन बनावटीचे हवाई दलातील प्रवासी विमान होते. या विमानाच्या शोधासाठी एसयू-३० जेट लढाऊ विमान, सी१३०जे, एमआय १७  आणि एएलएच हेलिकॉप्टर पाठवण्यात आली होती. आसाममधील जोरहाटपासून अरुणाचलप्रदेशमधील मेचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राऊंड या परिसरात विमानाची शोध मोहीम राबवण्यात येत होती. यासाठी इस्त्रोच्या सॅटेलाईटने काढलेल्या फोटोंचाही आधार घेण्यात येत होता. कार्टोसॅट आणि आरआयसॅट या उपग्रहांच्या माध्यमातून फोटो घेण्यात आले होते. वायू दलाचे माजी एअर ऑफिसर कमांडिंग इन चिफ मार्शल आर. डी. माथूर हे या बचाव आणि शोध मोहिमेचे प्रमुख होते. सध्या वायु दलाचे अधिकारी बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत आहेत.

पायलटची पत्नीच होती एटीसी ऑफिसर

एएन-३२ विमानाचा तीन जून रोजी बेपत्ता झाले. स्थानिक वेळेनुसार आसाममधील जोरहाट एअरबेसवरून दुपारी साडे बारा वाजता या विमानाने उड्डाण केले होते. त्यावेळी फ्लाइट लेफ्टनंट आशिष तन्वर विमानाचे पायलट होते. दुदैवाची बाब ही की त्यांची पत्नी संध्या तन्वर यादेखील एअरफोर्स ऑफिसर असून, त्या विमान बेपत्ता झालेल्या क्षणी एअर ट्रॅफिक कंट्रोलचे काम पाहत होत्या. विमान रडारवरून बेपत्ता झाल्याचं सगळ्यात आधी त्यांना कळलं. सध्या आणि आशिष यांचा फेब्रुवारी २०१८मध्येच विवाह झाला होता. संध्या यांनी मोठ्या धाडसाने स्वतः घरच्यांना घटनेची माहिती देऊन त्यांना बोलवून घेतल्याचे इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IAF AN-32: हवाई दलाचे एएन-३२ विमान अपघातग्रस्त; अरूणाचल प्रदेशमध्ये सापडले अवशेष Description: IAF AN-32: अरूणाचल प्रदेशमध्ये सियांग जिल्ह्यात लीपो येथून १६ किलोमीटर अंतरावर एएन-३२ विमानाचे अवशेष सापडले. हवाई दलाच्या एमआय १७ या विमानाच्या मदतीने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यास मदत झाल्याचे सांगण्यात आले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles