Ex गर्लफ्रेंडचे फोटोज डीलिट न करताच विकला फोन आणि मग...

लोकल ते ग्लोबल
Updated May 27, 2019 | 14:17 IST | टाइम्स नाऊ हिंदी

मोबाइल फोनची विक्री करताना अनेकजण निष्काळजीपणा करतात आणि त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये घडला आहे.

mobile phone
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

नवी दिल्ली: आपल्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटोज डीलिट न करताच एका व्यक्तीने मोबाइल फोन विकला आणि त्यानंतर घडल्या धक्कादायक घटना. त्याने फोन विकल्यानंतर एक हत्या, एक आत्महत्या आणि एक एन्काउंटर झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार घडला आहे. एका तरुणाने आपला मोबाइल फोन विकला मात्र, त्यात असलेले एक्स गर्लफ्रेंडचे आक्षेपार्ह फोटोज डीलिट करणं तो विसरला.

घटना शनिवारची आहे. एका ३५ वर्षीय महिलेचे फोटोज व्हायरल होत होते तिने आपल्या पाच वर्षीय मुलासह मुझफ्फरनगर येथील गंगानहरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला केला. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या मुलाचे प्राण वाचले आहेत.

चौकशीत पोलिसांना आढळलं की, मृतक महिलेचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे आक्षेपार्ह फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले होते. मिलालेल्या माहितीनुसार, महिलेचा एक्स बॉयफ्रेंड शुभम याने मेरठ येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला आपला मोबाइल फोन विकला होता. मात्र, हा फोन विकताना त्यामधील डेटा डीलिट करण्यास तो विसरला होता.

या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या फोनवरुन मोबाइल फोनच्या मालकाला फोन केला होता. या मोबाइल नंबरच्या आधारे महिलेच्या पतीने तो तनंबर ट्रेस केला आणि याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या मते अनुज प्रजापति नावाच्या व्यक्तीला शुभम याने फोन विकला होता. त्याने हे फोटोज सोशल मीडियात व्हायरल केले होते. मात्र, अनुज याचाच मृतदेह पोलिसांना आढळला त्यामुळे या घटनेला वेगळं वळणं लागलं. 

शुभम आणि त्याच्या मित्रांनी मिळून २३ मे रोजी त्याची हत्या केली होती. पोलिसांनी सांगितले की, प्रजापति याची हत्या करण्यात आल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट झालं आहे. या घटनेनंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी टीम तयार केली आहे. मेरठ पोलिसांनी आरोपी शुभम याला पकडणार त्याच्याआधीच सहारनपूर पोलिसांनी आरोपीला एका एन्काउंटर प्रकरणात अटक केली.

ही घ्या काळजी

नवा फोन घेण्यापूर्वी आपण जुना फोन विकतो मात्र हा फोन विक्री करताना खास काळजी घेणं आवश्यक आहे. फोन विक्री करत असताना त्यामधील आपली वैयक्तिक माहिती दुसऱ्या फोनमध्ये ट्रान्सफर करा किंवा डीलिट करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी