Women Marriage Age in India | भारतात महिलांचे लग्नाचे वय २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव, पाहा जगभरात काय आहे वय

देश
विजय तावडे
Updated Dec 17, 2021 | 15:47 IST

Modi government to raise women marriage age | केंद्रीय मंत्रिमंडळाने मुलींचे लग्नाचे वय (Women's Marriage Age in India)वाढवण्यासंदर्भातील प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील विधेयक आता संसदेत मांडले जाणार आहे. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षांवरून वाढून २१ वर्षे होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात यावरील आपले मत स्पष्ट केले होते. या विधेयकाला लवकरच संसदेत सादर केले जाईल

Women Marriage Age in India
महिलांचे लग्नाचे वय २१ वर्षे होणार 
थोडं पण कामाचं
  • भारतात महिलांच्या लग्नाचे वय वाढवण्याचा प्रस्ताव
  • केंद्रीय कॅबिनेटची लग्नाचे वय २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी
  • लवकरच यासंदर्भातील विधेयक संसदेत मांडले जाणार

Women Marriage Age in India | नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने मुलींचे लग्नाचे वय (Women's Marriage Age in India)वाढवण्यासंदर्भातील प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील विधेयक आता संसदेत मांडले जाणार आहे. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षांवरून वाढून २१ वर्षे होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात यावरील आपले मत स्पष्ट केले होते. या विधेयकाला लवकरच संसदेत सादर केले जाईल आणि मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यासाठी बाल विवाह कायद्यात दुरुस्ती केली जाईल. (Modi cabinet approves the proposal to raise the legal age of marrigae for women)

बाल विवाहाला आळा घालण्यासाठी आणि बालिकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी लग्नाच्या वयाची अट कायदेशीर करण्यात आली आहे. आतापर्यत कायद्यानुसार मुलींसाठी लग्नाचे किमान वय १८ वर्षे आणि मुलांचे २१ वर्षे आहे. 

मोदी सरकारने लग्नाचे वय वाढवण्याचा निर्णय का घेतला?
नरेंद्र मोदी सरकारने महिलांच्या लग्नासाठीच्या वयाचा पुनर्आढावा घेण्यामागे काही कारणे आहेत. यात लिंग समानता म्हणजे मुलगा आणि मुलीचे लग्नाचे वय सारखेच असावे हा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर लग्न लवकर झाले म्हणजे गरोदरपणाचा मुद्दादेखील लवकर येतो. याचा परिणाम महिलांच्या आणि त्यांच्या अपत्यांच्या शारीरिक आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. बालमृत्यूवरदेखील याचा परिणाम होतो. लहान मुलांचे आरोग्य, त्यांच्याशी निगडीत मृत्यूदर यावर लग्नाच्या वयाचा परिणाम होतो. शिवाय महिलांना शिक्षणाची संधी मिळणे आणि लग्नानंतर करियर किंवा नोकरी-व्यवसाय करण्याची संधी मिळणे यासंदर्भातदेखील महिला सक्षमीकरणाचा मुद्दादेखील यात आहे. अलीडेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हे झाला त्यात म्हटले आहे की बालविवाहात थोडीच घट झाली आहे. २०१५-१६ मध्ये २७ टक्के असणारे हे प्रमाण २०१९-२० मद्ये २३ टक्क्यांवर आले आहे. सरकार यात आणखी घट करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

जगभरातील विविध देशांमध्ये लग्नासंबंधीचे वय वेगवेगळे आहेत. कोणत्या देशात काय अट आहे ते पाहूया.


संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेली आकडेवारी-

देश महिला पुरुष Source Year
अमेरिका 18 18 2011 (अलग-अलग राज्य में अलग उम्र)
इंग्लंड 18 18 2011
ऑस्ट्रेलिया 18 18 2011
बांग्लादेश 18 21 2004
ब्राझिल 18 18 2011
कॅनडा 18 18 2011
चीन 20 22 2011 (वेगवेगळ्या राज्यात वयाची अट वेगवेगळी असू शकते)
इस्त्रायल 17 17 2011
इटली 18 18 2011
जपान 20 20 2011
म्यानमार 20 20 2011
नेपाळ 20 20 2011
नेदरलॅंड 18 18 2011
न्यूझीलॅंड 18 18 2011
पाकिस्तान 16 18 2013
रशिया 18 18 2011
सिंगापूर 21 21 2011
दक्षिण आफ्रीका 21 21 2011
स्विट्जरलैंड 18 18 2011
फ्रान्स 18 18 2011

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी