मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात एनडीएमध्ये हालचालींना वेग, जेडीयु, एलजेपीला मंत्रीपदे मिळण्याची शक्यता

मोदी सरकारमध्ये यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. मोदी सरकारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे म्हणजे जेडीयुचे प्रतिनिधित्व नाममात्रच आहे आणि इतर मित्र पक्षांमध्ये फक्त रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचाच समावेश.

Expansion in Modi cabinet
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे 

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान मोदींची वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक
  • मित्रपक्षांना मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता
  • काही मंत्र्यांचे ओझे कमी होणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्यकाळास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत आणि अजून एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झालेला नाही. कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मागील वर्षभरात यासंदर्भात कोणतीही हालचाल झाली नव्हती. मात्र आता मोदी सरकारमध्ये यासंदर्भात हालचाली (Expansion in Modi Cabinet is expected) सुरू झाल्या आहेत. मोदी सरकारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे म्हणजे जेडीयुचे (JDU) प्रतिनिधित्व नाममात्रच आहे आणि इतर मित्र पक्षांमध्ये फक्त रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले (Ramdas Aathavale of Republican Party) यांचाच समावेश आहे. आठवले यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे आणि संपूर्ण कॅबिनेटमध्ये भाजपचाच (BJP) दबदबा आहे. (Modi Cabinet Expansion : NDA may get more representation in cabinet, JDU & LJP likely to get ministry)

पंतप्रधान मोदींची वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाच्या इतर सहकाऱ्यांसोबत बैठक केली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डादेखील हजर होते. सूत्रांकडून याबाबतची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनी मागील आठवड्यातदेखील याप्रकारची बैठक घेतली होती. या बैठकांद्वारे पंतप्रधान मोदी विविध खात्यांच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा करत आहेत.

मित्रपक्षांना मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचे भावी गणित लक्षात घेता भाजप आपल्या मित्र पक्षांना अधिक स्थान देण्याची शक्यता आहे. याआधी मंत्रिमंडळात सामील होण्यास नकार देणारा जेडीयू आता मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतो. याशिवाय तामिळनाडूमध्ये सत्तेपासून लांब गेलेल्या अण्णाद्रमुक पक्षदेखील केंद्रात सत्तेत सहभागी होण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशात आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिसत असलेल्या राजकीय समीकरणांना लक्षात घेऊन अपना दललादेखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. 

लोकजनशक्ति पार्टी म्हणजेच एलजेपीच्या नव्या गटाला मिळू शकतो फायदा

अलीकडेच घडलेल्या मोठ्या फेरबदलात लोक जनशक्ति पार्टीमध्ये पडलेल्या फुटीचा परिणामदेखील मंत्रिमंडळ विस्तारात दिसू शकतो. बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्यावेळी जेडीयुविरुद्ध उभे राहून निवडणुक लढवलेल्या एलजेपीमध्ये फूट पडली आहे आणि त्याचे नेते चिराग पासवान पक्षात एकटे पडले आहेत. पक्षाच्या सहा खासदारांपैकी पाच खासदारांनी आपला वेगळा गट बनवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत आणि भाजप एलजेपीच्या मोठ्या गटाला आपल्यासोबत घेऊन दलितांना संदेश देऊ इच्छिते, त्यामुळे एलजेपीला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

काही मंत्र्यांचे ओझे कमी होणार

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभावित विस्तारात सध्याच्या काही मंत्र्यांमधील अर्धा डझन मंत्र्यांवरील ओझे कमी केले जाऊ शकते. त्यांच्याकडील काही खाती काढून घेतली जाऊ शकतात. या मंत्र्यांकडे दोन ते तीन मंत्रालयांचा कारभार आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि पुनर्रचनेत जवळपास दीड डझन नव्या मंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी