New year पूर्वी रेशन कार्ड धारकांसाठी भेट, डिसेंबर २०२३ पर्यंत मिळणार मोफत रेशन

Ration Card |राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत 80 कोटी लोकांना दिले जाणारे मोफत धान्य आता डिसेंबर 2023 पर्यंत वितरित केले जाईल.

Modi government gave a big gift before the new year, will get free ration till December 2023
New year पूर्वी रेशन कार्ड धारकांसाठी भेट, डिसेंबर २०२३ पर्यंत मिळणार मोफत रेशन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • खुशखबर! केंद्र सरकारने मोफत धान्य वाटपाबाबत घेतला मोठा निर्णय
  • गरिबांना आणखी एक वर्ष मोफत धान्य मिळणार आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : मोदी सरकारने नवीन वर्षापूर्वी जनतेला भेट दिली आहे. आता लोकांना डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बैठकीनंतर सांगितले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आता 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे. गोयल पुढे म्हणाले की, डिसेंबर 2023 पर्यंत लोकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही. त्यांच्या मते यावर सरकार दरवर्षी सुमारे दोन लाख कोटी रुपये खर्च करेल. (Modi government gave a big gift before the new year, will get free ration till December 2023)

अधिक वाचा : सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना !, सैनिकांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळल्याने 16 जण शहीद


लोकांना किती तांदूळ आणि गहू मिळणार?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, सरकार सध्या प्रति व्यक्ती 5 किलो धान्य 2 ते 3 प्रति किलो या दराने पुरवले जाते. अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत समाविष्ट कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य मिळते. या कायद्यानुसार गरीबांना तांदूळ ३ रुपये किलो आणि गहू २ रुपये किलोने मिळतो.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत अन्नधान्य पुरविण्याचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार आहे.

PMGKAY चा पाठपुरावा न करण्याचा निर्णय

दरम्यान, सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना ३१ डिसेंबरला संपणार आहे. या योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत समाविष्ट 81.35 कोटी लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मोफत मिळते. हे NFSA अंतर्गत उपलब्ध अनुदानित अन्नधान्याव्यतिरिक्त आहे.

अधिक वाचा : Nasal Vaccine : इंजेक्शनऐवजी येणार 'दोन थेंब' डोस ; भारत बायोटेकच्या Nasal व्हॅक्सीनला मंजूरी

सप्टेंबरमध्ये मोदी सरकारने या योजना आणखी तीन महिन्यांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवल्या होत्या. ही योजना एप्रिल 2020 मध्ये सुरू करण्यात आली. कोविड काळात गरिबांना मदत करण्यासाठी याची सुरुवात करण्यात आली होती. सरकारी अधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाला देशातील गरिबांसाठी नवीन वर्षाची भेट असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, यामुळे NFSA अंतर्गत येणाऱ्या 80 कोटींहून अधिक लोकांना आता मोफत धान्य मिळणार आहे. लाभार्थ्यांना धान्य मिळण्यासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी