Modi सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! खरीप हंगामात DAP खताच्या किंमती नाहीत वाढणार

Modi Cabinet Decision: मोदी मंत्रिमंडळाने डीएपी खतावरील अनुदान 1650 रुपयांवरून 2501 रुपयांपर्यंत वाढवले ​​आहे.

Modi government's big decision for farmers! DAP fertilizer prices will not increase during kharif season
Modi सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! खरीप हंगामात DAP खताच्या किंमती नाहीत वाढणार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • खरीप हंगामासाठी खतांवरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय
  • डीएपी खताची एक पोती 1350 रुपये पूर्वीप्रमाणेच मिळत राहील.
  • वाढीव अनुदान ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार

नवी दिल्ली : खरीप हंगामातील भात आणि इतर पिकांच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. खरीप हंगामासाठी खतांवरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंत्रिमंडळाने एकूण 61000 कोटींच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे. (Modi government's big decision for farmers! DAP fertilizer prices will not increase during kharif season)

अधिक वाचा : 

पाकिस्तानमध्ये घराणेशाही; भुत्तो पुत्र झाला परराष्ट्रमंत्री, माजी परराष्ट्रमंत्री झाल्या परराष्ट्र राज्यमंत्री

अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आता शेतकऱ्यांना उपलब्ध खतांच्या किमती वाढणार नसून त्यांना जुन्याच दराने खत मिळत राहणार आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, प्रति पोते डीएपी खतावरील अनुदान 1650 रुपयांवरून 2501 रुपये करण्यात आले आहे. याचा परिणाम असा होईल की डीएपी खताची एक पोती 1350 रुपये पूर्वीप्रमाणेच मिळत राहील.

अधिक वाचा : 

Corona Update: राजधानी दिल्लीत कोरोनाचा धोका सर्वाधिक; जाणून घ्या मागील २४ तासांचा डेटा 

यंदाच्या खरीप हंगामासाठी या अनुदानात वाढ करण्यात आली असून वाढीव अनुदान ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. म्हणजेच खरीप हंगामातील भात आणि इतर पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना यंदाही त्याच भावात खत मिळत राहणार आहे. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या किमतीत वाढ होऊनही सरकारने त्याचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ दिला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी