Modi-Modi: 'मोदी-मोदी'चा जयघोष केला तरच उघडणार घराचा दरवाजा

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 16, 2019 | 15:18 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Modi-Modi slogans: तुमच्या घराचा दरवाजा उघडण्यासाठी दरवाजा शेजारी लावण्यात आलेली बेल वाजवण्यात येते. मात्र, अशी एक वसाहत आहे जेथे नागरिकांनी आपल्या घराचा दरवाजा उघडण्यासाठी मोदी-मोदीच्या घोषणा करण्याचं म्हटलंय.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • एका मुस्लिम वसाहतीत नागरिकांनी घराबाहेर लावले पोस्टर 
  • पोस्टरवर लिहिलं, घराचा दरवाजा उघडण्यासाठी मोदी-मोदीच्या घोषणा द्या
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगले काम केल्याने या वसाहतीमधील नागरिकांनी घेतला हा निर्णय 

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड आहे आणि त्यांची प्रशंसा करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी एका मुस्लिम भागातील नागरिकांनी एक वेगळी पद्धत अवलंबली आहे. या नागरिकांच्या कौतुकाची पद्धत सध्या सर्वत्र चर्चेता विषय ठरली आहे.

हरियाणातील अंबाला येथे असलेल्या मुस्लिम रहिवासी परिसरातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी एका वेगळ्याच पद्धतीचा वापर केला आहे. या परिसरातील नागरिकांनी आपल्या घराच्या बाहेर पोस्टर चिटकवले आहेत. या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे, "दरवाजाची बेल खराब आहे, कृपया दरवाजा उघडण्यासाठी मोदी-मोदी (Modi-Modi) च्या घोषणा द्या".

हे पोस्टर्स लावल्याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी खूप महत्वाचे निर्णय घेतले आहेत, योजना सुरु केल्या आहेत. मग ती आयुष्मान योजना असो, उज्वला योजना असो किंवा तीन तलाक रद्द करण्याचा निर्णय असो. मोदींनी घेतलेले हे निर्णय आमच्यासाठी खूपच महत्वाचे आहेत. 

या स्थानिक नागरिकांनी सांगितले की, हरियाणात आता विधानसभा निवडणुका होत आहेत आणि त्यासाठी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यांच्या दरवाजात मत मागण्यासाठी येत आहेत. हे पोस्टर्स पाहून इतर पक्षातील नेते, उमेदवारांकडे मतं मागायला येणार नाहीत.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ट्रिपल तलाक रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचं सर्वच मुस्लिम महिलांनी स्वागत केलं. त्यानंतर आता मुस्लिम महिलांनी घराबाहेर मोदी-मोदी नावाच्या घोषणा दिल्यास दरवाजा उघडण्यात येईल असे पोस्टर लावले आहेत. आता इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते, उमेदवार मोदींचं नाव घेणार नाहीत त्यामुळे दरवाजे सुद्धा उघडण्यात येणार नाहीत असंही स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी