Monkeypox पासून बचाव करायचाय मग फिजिकल रिलेशन दरम्यान चुकूनही करू नका ही चूक, WHO ने दिला सल्ला

WHO advices over Monkeypox: मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होताना दिसून येत आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • जगभरातील ७५ हून अधिक देशांत मंकीपॉक्सचा शिरकाव
  • जागतिक आरोग्य संघटनेने दिला महत्त्वपूर्ण सल्ला

Monkeypox alert: कोरोनाचा प्रादुर्भाव आता कुठे कमी झाला असताना आता मंकीपॉक्सचा जगभरातील विविध देशांत शिरकाव होताना दिसत आहे. भारतातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. केरळ आणि दिल्लीत मंकीपॉक्स बाधित आढळले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आफ्रिका आणि यूरोपमधील अनेक देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. मंकीपॉक्सचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्याच दरम्यान आता WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. (monkeypox alert who advise men at risk of monkeypox to consider limiting sexual relations with partners)

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेडरोस अदनहोम गेब्रेहेसुस यांनी सल्ला दिला आहे की, ज्या पुरुषांना मंकीपॉक्सचा धोका आहे त्यांनी सध्यातरी फिजिकल रिलेशन ठेवलं जाणाऱ्या जोडीदारांची संख्या मर्यादित ठेवली पाहिजे. म्हणजेच अधिक लोकांसोबत शारीरिक संबंध न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अलीकडेच डब्ल्यूएचओने मंकीपॉक्स महामारीला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलं आहे. 

७८ देशांमध्ये मंकीपॉक्स बाधित १८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सुमारे ७० टक्के बाधित हे युरोपातील आहेत. तर बहुतेक बाधित हे असे पुरूष आहेत ज्यांनी पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. विशेषत: असे पुरुष जे अनेक लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवतात.

अधिक वाचा : Monkeypox in India: भारताला मंकीपॉक्सची चिंता, देशात कधी येणार लस?, अदार पूनावाला यांनी सांगितला संपूर्ण प्लान

आजाराची लक्षणे :

ताप, लसिका ग्रंथींना (कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथ) सूज येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला या प्रकारची लक्षणे रुग्णात आढळतात. कुपोषण, कमी प्रादुर्भाव आणि प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या समूदायामध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरुप धारण करु शकतो.

अधिक वाचा : Monkeypox: देशात वाढतोय Monkeypox,'ही' लस घेतली असेल धोका होतो कमी

आजाराचा कालावधी किती? 

या आजाराचा कालावधी ६ ते १३ दिवस असला तरी सुद्धा हा कालावधी ५ ते २१ दिवसांपूर्यंत असू शकतो. संसर्गजन्य कालावधी अंगावर पुरळ उठण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपर्ण बरे होईपर्यंत असतो. असा बाधित रुग्ण हा इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य रुग्ण असतो.

मंकीपॉक्स बाधित व्यक्तीबात काय काळजी घ्यावी? 

  1. पहिल्यांदा बाधित व्यक्तीचे विलगीकरण करावे. रुग्णावर विलगीकरणातच उपचार करावेत. 
  2. बाधित व्यक्तीला मास्कने नाक आणि तोंड झाकायला लावणे. याशिवाय त्वचेवर काही जखमा असल्यास त्या स्वच्छ कापडानी झाकून ठेवाव्यात. यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींच बाचव होऊ शकेल. 
  3. बाधित रुग्णाची माहिती आरोग्य केंद्राला द्या. 
  4. रुग्णाने वापरलेल्या बेडशीट, कपडे किंवा टॉवेल्स अशा गोष्टींचा वापर टाळा. 
  5. साबण, पाणी वापरुन हात स्वच्छ ठेवा किंवा सॅनिटायझर वापरुन हात स्वच्छ करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी