Monkeypox : जगातील २९ देशांमध्ये मंकीपॉक्सचे एक हजारपेक्षा जास्त रुग्ण

Monkeypox Cases Above 1000 In 29 Countries Britain Reports Highest Infections US Agency Raised Alert Level : जगातील २९ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत.

Monkeypox Cases Above 1000 In 29 Countries Britain Reports Highest Infections US Agency Raised Alert Level
जगातील २९ देशांमध्ये मंकीपॉक्सचे एक हजारपेक्षा जास्त रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जगातील २९ देशांमध्ये मंकीपॉक्सचे एक हजारपेक्षा जास्त रुग्ण
  • जगात कोरोनामुळे ६३ लाख २३ हजार ७५१ मृत्यूची नोंद यापैकी १० लाख ३४ हजार २८४ मृत्यूची नोंद एकट्या अमेरिकेत
  • अमेरिकेतच मंकीपॉक्स आजाराचे ३० रुग्ण

Monkeypox Cases Above 1000 In 29 Countries Britain Reports Highest Infections US Agency Raised Alert Level : जगातील २९ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जगात एक हजारपेक्षा जास्त मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी मंकीपॉक्स प्रकरणी जगाला धोक्याचा इशारा दिला आहे.

जगात कोरोनामुळे ६३ लाख २३ हजार ७५१ मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी १० लाख ३४ हजार २८४ मृत्यूची नोंद एकट्या अमेरिकेत झाली आहे. आता अमेरिकेतच मंकीपॉक्स आजाराचे ३० रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत संसर्गजन्य आजारांचे संकट हाताळणाऱ्या सीडीसी या संस्थेने नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.

मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाच्या वस्तू वापरू नका. रुग्णाचे कपडे स्वतंत्रपणे धुवा. रुग्णाने तसेच तो जिथे वास्तव्यास आहे त्या घरातील सर्व सदस्यांनी स्वच्छतेच्याबाबतीत जास्त खबरदारी घ्यावी अशी सूचना अमेरिकेत संसर्गजन्य आजारांचे संकट हाताळणाऱ्या सीडीसी या संस्थेने नागरिकांना दिली आहे. मृत उंदीर, मांजर, माकड आणि वानर यांच्यापासून दूर रहावे असाही इशारा सीडीसीने दिला आहे. जंगली प्राण्यांचे मांस खाणे टाळा, अंगावर लालसर रंगाचे फोड मोठ्या प्रमाणावर येऊ लागताच डॉक्टरांचा सल्ला घ्या; असेही आवाहन सीडीसीने नागरिकांना केले आहे.

ताज्या आकडेवारीनुसार ६ जून २०२२ पर्यंत जगातील २९ देशांमध्ये मंकीपॉक्स आजाराचे १०१९ रुग्ण आढळले आहेत. यात यूकेमध्ये आढळलेल्या ३०२ आणि अमेरिकेत आढळलेल्या ३० रुग्णांचाही समावेश आहे. मंकीपॉक्स हा आजार यूके, अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा, जर्मनी या बड्या देशांमध्ये आढळला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी