हुश्श, मंकीपॉक्सचा धोका कमी झाला : WHO

Monkeypox Cases Drop 21 Percent Worldwide says WHO : जगातील मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये २१ टक्क्यांची घट झाली आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization - WHO) ही माहिती दिली आहे. 

Monkeypox Cases Drop 21 Percent Worldwide says WHO
हुश्श, मंकीपॉक्सचा धोका कमी झाला : WHO  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • हुश्श, मंकीपॉक्सचा धोका कमी झाला : WHO
  • जगातील मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये २१ टक्क्यांची घट
  • मंकीपॉक्सबाधीत व्यक्तीच्या वस्तू, कपडे, अंथरूण-पांघरूण यांचा वापर केला तरी आजार पसरण्याचा धोका

Monkeypox Cases Drop 21 Percent Worldwide says WHO : जगातील मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये २१ टक्क्यांची घट झाली आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization - WHO) ही माहिती दिली आहे. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार एप्रिल अखेरीपासून आतापर्यंत ९८ देशांमध्ये ४५ हजारांपेक्षा जास्त मंकीपॉक्सबाधीत रुग्णांची नोंद झाली होती. यामुळे कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्सच्या रुपाने आणखी एका संसर्गजन्य आजाराचे संकट जगावर येणार असे वाटत होते. पण आता मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये घट होऊ लागली आहे. 

कोणत्या शहरात कोणते रुचकर पदार्थ खावे

मंकीपॉक्स या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृती आणि वेळेवर उपचार होणे या दोन अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. प्रामुख्याने अमेरिका या देशात तसेच लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये मंकीपॉक्सबाबत जनजागृती आणि आधुनिक वैद्यकीय सेवांची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. 

विना कपडे या ठिकाणी बिनधास्त साजरा करा हनीमून

मागच्या आठवड्यात जगात मंकीपॉक्सच्या नव्या ५९०७ रुग्णांची नोंद झाली. इराण आणि इंडोनेशिया या दोन देशांमध्ये पहिल्या मंकीपॉक्सबाधिताची नोंद झाली आहे. अमेरिका या देशात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. आफ्रिका खंडात मागच्या आठवड्यात मंकीपॉक्सच्या नव्या २१९ रुग्णांची नोंद झाली. प्रामुख्याने नायजेरिया आणि काँगो या आफ्रिकेतील देशांमध्ये मंकीपॉक्सचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. 

मे महिन्यापासून जगभरात मंकीपॉक्स आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना हळू हळू यश मिळत आहे. यामुळेच आता  जगातील मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये २१ टक्क्यांची घट झाली आहे. 

रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मंकीपॉक्सचे संकट संपलेले नाही. यामुळे पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य आजार आहे. यामुळे मंकीपॉक्सबाधीत रुग्णाच्या संपर्कात येताना मास्क, हँडग्लोव्हज वापरले नाही, आवश्यक ती खबरदारी घेतली नाही आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले नाही तर आजार पसरण्याचा धोका असतो. मंकीपॉक्सबाधीत व्यक्तीने असुरक्षित पद्धतीने लैंगिक संबंध ठेवले तरी आजार पसरण्याचा धोका असतो. मंकीपॉक्सबाधीत व्यक्तीच्या वस्तू, कपडे, अंथरूण-पांघरूण यांचा वापर केला तरी आजार पसरण्याचा धोका असतो; असे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी