Delhi reports first monekypox case: मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण भारतात आढळला आहे. रविवारी (२४ जुलै) भारताची राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. धक्कादायक म्हणजे या रुग्णाचा कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसतानाही त्याला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. (Monkeypox in India delhi reports first case this is the fourth patient of disease in country)
न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मंकीपॉक्सची लागण झालेल्या या रुग्णाला मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ३१ वर्षीय या तरुणाला ताप आणि त्वचेवर काही जखमा असल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी तीन जणांना केरळमध्ये मंकीपॉक्सची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
First Monkeypox case reported in Delhi, admitted to Maulana Azad Medical College, confirms Health Ministry. The patient is a 31-year-old man with no travel history who was admitted to the hospital with fever and skin lesions. — ANI (@ANI) July 24, 2022
हे पण वाचा : रणवीर सिंगचे फिटनेस रुटीन आणि डाएट प्लान
डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी सांगितले की, ७० हून अधिक देशांत मंकीपॉक्सचा प्रसार झाला आहे. ही एक असाधारण परिस्थिती आहे. जी आता जागतिक आरोग्य आणीबाणी आहे. डब्लूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस ए. गेब्रेयसस यांनी म्हटलं की, मंकीपॉक्सचा विषय हा आंतराष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. आरोग्य संघटनेच्या 'Emergency Committee'च्या सदस्यांमध्ये एकमत नसतानाही ही घोषणा करण्यात आली. WHO कडून अशा प्रकारची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हे पण वाचा : महिलांकडून पैसे आणि दागिने चोरणारी सिनियर सिटीझन गँग गजाआड
पहिल्यांदा बाधित व्यक्तीचे विलगीकरण करावे. रुग्णावर विलगीकरणातच उपचार करावेत.
बाधित व्यक्तीला मास्कने नाक आणि तोंड झाकायला लावणे. याशिवाय त्वचेवर काही जखमा असल्यास त्या स्वच्छ कापडानी झाकून ठेवाव्यात. यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींचा बचाव होऊ शकेल.
बाधित रुग्णाची माहिती आरोग्य केंद्रात द्या.
रुग्णाने वापरलेल्या डेबशीट, कपडे किंवा टॉवेल्स अशा गोष्टींचा वापर टाळा.
साबण, पाणी वापरुन हात स्वच्छ ठेवा किंवा सॅनिटायझर वापरुन हात स्वच्छ करा.
दक्षिण भारतात मंकीपॉक्सची लागण झालेले तीन रुग्ण आढळून आले आहेत. २२ जुलै रोजी तिसरा रुग्ण आढळून आला होता. या महिन्याच्या सुरुवातीला यूएईमधून परतलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळली होती. त्यानंतर त्याला मंकीपॉक्स झाल्याच्या वृत्ताला आरोग्य यंत्रणेने दुजोरा दिला. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, मलप्पुरमचा रहिवासी असलेला तरुण ६ जुलै रोजी राज्यात परतला. त्याच्यावर तिरूवनंतपुरम येथील मंजेरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या बाधिताच्या संपर्कात आलेल्या नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.