नवी दिल्ली: Adar Poonawalla on Monkeypox Vaccine: कोरोनानंतर (Corona Virus) मंकीपॉक्सनं (Monkeypox) भारतात पसार सुरू करण्यास सुरूवात केली आहे. देशात आतापर्यंत 8 प्रकरणे समोर आली आहेत.यामध्ये दिल्लीतील दोन आणि केरळमधील (Kerala) चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढू लागली आहे. मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंकीपॉक्स लस कधी येईल? याचं उत्तर दिलं आहे. अदार पूनावाला (Adar Poonawalla) म्हणाले की, या मंकीपॉक्सविरूद्ध लस शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. (Monkeypox Virus Vaccine)
मंकीपॉक्सवर लस शोधण्यासाठी संशोधन सुरू असल्याचं पूनावाला यांनी सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अधिक वाचा- मुंबईकरांनो काळजी घ्या, स्वाइन फ्लू आणि मलेरियाचा वाढतोय कहर
सरकारने काढल्या निविदा
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या आदेशानुसार पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) द्वारे मंकीपॉक्स विषाणू आधीच वेगळे केले गेले आहेत. मंकीपॉक्सला आळा घालण्यासाठी ICMR ने 27 जुलै रोजी स्वदेशी लस आणि चाचणी किट तयार करण्यासाठी निविदा काढली आहे. ज्यामध्ये स्वारस्य असलेले भारतीय लस उत्पादक, फार्मा कंपन्या इत्यादी अभिव्यक्ती स्वारस्य (EoI) दाखल करण्याची शक्यता आहे.
देशात मंकीपॉक्सची आठ प्रकरणे
पूनावाला मंगळवारी निर्माण भवन येथे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना त्यांच्या कंपनीच्या तयारीची माहिती देत होते. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत एका 35 वर्षीय व्यक्तीमध्ये संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे.
मंकीपॉक्सचा व्हायरस कसा पसरतो?
हा व्हायरल प्राण्यांमार्फत पसरतो. हा व्हायरस शरीरात असणारे प्राणी दुसऱ्या प्राण्यांकडे हा व्हायरस संक्रमित करतात. माणसाच्या शरीरातही हा व्हायरस प्रवेश करू शकतो. कुठल्याही प्रकारे या व्हायरसच्या संपर्कात आल्याने किवा संक्रमित व्यक्तीसोबतच्या लैंगिक संबंधांमुळेही हा व्हायरस पसरण्याची शक्यता असते.
काय आहेत उपाय?
या व्हायरसवर अद्याप कुठलंही रामबाण औषध आलेलं नाही. सध्या बाजारात असं कुठलंही औषध उपलब्ध नाही, जे या व्हायरसला मारू शकेल. याचा सिंड्रोमिक इलाज करण्यात येतो. जर या काळात ताप आला, तर तापाचं औषध, जर घाम येत असेल तर डिहायड्रेशनवरचा उपाय करून या आजाराचा सामना केला जातो. हा आपोआप बरा होणारा आजार आहे. काही दिवसांत शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या व्हायरसवर मात करते. मात्र त्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती शरीरात चांगल्या स्वरुपात असणं गरजेचं असतं.
अधिक वाचा- उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला, पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड; शहरप्रमुखांसह पाच जण अटकेत
मंकीपॉक्सच्या आजाराची लक्षणे
ताप, लसिका ग्रंथींना (कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथ) सूज येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला या प्रकारची लक्षणे रुग्णात आढळतात. कुपोषण, कमी प्रादुर्भाव आणि प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या समूदायामध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरुप धारण करु शकतो.