Monkeypox in India: भारताला मंकीपॉक्सची चिंता, देशात कधी येणार लस?, अदार पूनावाला यांनी सांगितला संपूर्ण प्लान

Monkeypox Vaccine:देशात मंकीपॉक्स (Monkeypox) नावाच्या आजारानं थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे जगातील 75 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे आढळून आली आहेत.

Monkeypox  vaccine
मंकीपॉक्सचा कहर 
थोडं पण कामाचं
  • जगातील 75 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे आढळून आली आहेत.
  • जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा (corona virus) कहर अजूनही पूर्णपणे संपलेला नाही.
  • भारतातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry) जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर सर्व राज्य सरकारांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवी दिल्ली:  Monkeypox Vaccine in India,  Adar Poonawalla: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा (corona virus) कहर अजूनही पूर्णपणे संपलेला नाही तोच देशात मंकीपॉक्स (Monkeypox) नावाच्या आजारानं थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे जगातील 75 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे आढळून आली आहेत. तर भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सची चार प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी तीन प्रकरणे केरळमध्ये (Kerala) समोर आली आहेत. भारतातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry) जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर सर्व राज्य सरकारांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर एसआयआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी सांगितलं की, त्यांची लस भारतात कधी येणार आहे.

काय म्हणाले अदार पूनावाला 

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डॅनिश कंपनी बव्हेरियन नॉर्डिकशी देशातील मंकीपॉक्सच्या प्रकरणांचा सामना करण्यासाठी लसींच्या काही खेप आयात करण्यासाठी बातचीत करत असल्याची माहिती अदार पूनावाला यांनी मंगळवारी दिली.

अधिक वाचा-  मोठी बातमी: भाजप नेत्याची तलवार, कुऱ्हाडीनं हत्या

डेन्मार्कसोबत सीरमची सुरू आहे बातचीत 

NDTV च्या वृत्तानुसार, सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांनी सांगितलं की,  मंकीपॉक्सची मेसेंजर लस विकसित करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नोव्हावॅक्सशी बातचीत करत आहे. सध्या, ते सध्या आपत्कालीन परिस्थितीत मालपॉक्स लस मोठ्या प्रमाणात आयात करण्याच्या शक्यतेवर काम करत आहे. डॅनिश कंपनी बव्हेरियन नॉर्डिकची स्मॉलपॉक्स लस तीन महिन्यांत भारतात येण्याची ही शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

लस बनवण्याची प्रक्रिया थोडी मोठी

सीरम इन्स्टिट्यूटकडे परवान्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात चेचक लस तयार करण्याची क्षमता असल्याची माहिती ही त्यांनी दिली. आम्हाला हे देखील बघावं लागणार आहे की, लसीला खूप मागणी येईल की येत्या तीन ते चार महिन्यात हा आजार आटोक्यात येईल. कारण लस बनवण्याची प्रक्रिया बऱ्याचदा लांबलचक असते आणि एका वर्षापेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता असते, असंही ते म्हणालेत. 

मंकीपॉक्स लस कोरोना लसीपेक्षा वेगळी

पूनावाला यांनी असंही सांगितलं की, मंकीपॉक्सची लस कोरोनाच्या लसीपेक्षा वेगळी आहे. यामध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येते. सध्या आमच्याकडे यासाठी लस नाही पण आम्ही या दिशेनं वेगाने वाटचाल करत आहोत. 

दिल्लीत एकाला मंकीपॉक्सची लक्षणे

पूनावाला यांनी ही माहिती अशा वेळी दिली आहे की जेव्हा देशात मंकीपॉक्सबाबत दहशतीचे वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे, मंकीपॉक्सची लक्षणे असलेल्या आणखी एका संशयित रुग्णाला मंगळवारी दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा रुग्ण ताप आणि त्वचेवर पुरळ या लक्षणांसह रुग्णालयात आपत्कालीन स्थितीत दाखल झाला आहे. या रुग्णाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. आफ्रिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये हजारो लोकांना संसर्ग झाल्यानंतर हा आजार भारतात आला असून देशातील अनेक शहरांमध्ये याच्याशी लढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी