Monsoon Update: मुसळधार पावसाचा कहर, पूर आणि भूस्खलनात 31 जणांचा मृत्यू; अनेक बेपत्ता

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 21, 2022 | 08:28 IST

Flash floods and landslides in Himachal Pradesh: अनेक ठिकाणी पूर, भूस्खलन (Floods, Landslides) आणि घरांची पडझड होऊन जवळपास 31 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. मृतांमध्ये 22 लोक एकट्या हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) आहेत.

Himachal Pradesh
मुसळधार पावसाचा कहर  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • अनेक ठिकाणी पूर, भूस्खलन (Floods, Landslides) आणि घरांची पडझड होऊन जवळपास 31 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. मृतांमध्ये 22 लोक एकट्या हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) आहेत.
  • उत्तराखंड (Uttarakhand) आणि ओडिशामध्ये (Odisha) प्रत्येकी चार आणि झारखंडमध्ये (Jharkhand) एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेश: Many dead in flash floods, landslides in Himachal Pradesh: उत्तरेकडील डोंगराळ भागात आणि पूर्वेकडील मैदानी भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं (Heavy rain)  धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर, भूस्खलन (Floods, Landslides)  आणि घरांची पडझड होऊन जवळपास 31 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. मृतांमध्ये 22 लोक एकट्या हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) आहेत. त्याच वेळी, उत्तराखंड (Uttarakhand)  आणि ओडिशामध्ये (Odisha)  प्रत्येकी चार आणि झारखंडमध्ये (Jharkhand) एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

हिमाचल प्रदेशात गेल्या 24 तासांत मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलन, पूर आणि ढगफुटीमध्ये किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी आठ जण एकाच कुटुंबातील आहेत. राज्यात झालेल्या या अपघातांमध्ये दहा जण जखमी झाले आहेत. 

अधिक वाचा- अपघातानं हादरला 'हा' देश, एकाच वेळी 32 ठार; 52 जण जखमी

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे राज्यात पूरस्थिती, भूस्खलन आणि अपघात सुरूच आहेत. मंडी जिल्ह्यात मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले आहेत. त्याचबरोबर शिमला जिल्ह्यातही परिस्थिती बिकट आहे. शोघी आणि तारा देवी दरम्यान सोनू बांगला येथे दरड कोसळली आहे. शिमला-कालका दरम्यान राष्ट्रीय महामार्ग-5 ब्लॉक आहे. दगड अजूनही सक्रियपणे पडत आहेत. शोघी मेहली बायपासवरून वाहतूक वळवण्यात आली आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी सांगितलं की, मुसळधार पावसामुळे मंडी, कांगडा आणि चंबा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 36 हवामानशास्त्रीय घटनांची नोंद झाली आहे. मंडीतील मनाली-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग आणि शोघीमधील शिमला-चंदीगड महामार्गासह 743 रस्ते पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर मंडी जिल्ह्याच्या उपायुक्तांनी सांगितलं की, एकट्या मंडी जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण बेपत्ता झाले.

हिमाचल प्रदेशात 25 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

हिमाचल प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 25 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सुदेश कुमार मोख्ता यांनी सांगितले की, कांगडा, चंबा, मंडी, कुल्लू, शिमला, सिरमौर, सोलन, हमीरपूर, उना आणि बिलासपूर जिल्ह्यांमध्ये पुढील तीन-चार दिवस पाऊस सुरू राहील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

शनिवारी उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या विविध घटनांमध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाला तर 10 जण बेपत्ता झाले. पावसामुळे बंधारे कोसळले, पूल वाहून गेले आणि घरांमध्ये चिखल आणि पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक गावांतील लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.  देशाच्या पूर्व भागातही काही ठिकामी पावसाचा परिणाम झाला आहे. महानदीचा परिसर आधीच ओडिशातील पुराच्या विळख्यात आहे आणि सुमारे 4 लाख लोक 500 गावांमध्ये अडकले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी