Montenegro: घरगुती वादातून राग अनावर, रस्त्यावर येऊन अंदाधुंद गोळीबार; 11 जणांचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 13, 2022 | 09:39 IST

Montenegro Gun Attack: कौटुंबिक वादानंतर एका व्यक्तीने रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला. काही वेळातच मारेकरीही पोलिसांच्या चकमकीत ठार झाला आहे.

Shooting in Montenegro
अंदाधुंद गोळीबारात 11 ठार  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय बंदुकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात पोलीस कर्मचाऱ्यासह सात जण जखमी झाले.
  • मोंटेनिग्रोच्या सरकारी दूरचित्रवाणीनं शुक्रवारी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.
  • एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याने मुलांनाही सोडलं नाही.

ब्रिटन: Shooting in Montenegro: युरोपमधील मोंटेनिग्रोमध्ये (montenegro) गोळीबाराची (Shooting Incident) घटना घडली आहे. कौटुंबिक वादानंतर एका व्यक्तीने रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला. काही वेळातच मारेकरीही पोलिसांच्या चकमकीत ठार झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय बंदुकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात पोलीस कर्मचाऱ्यासह सात जण जखमी झाले. मोंटेनिग्रोच्या सरकारी दूरचित्रवाणीनं शुक्रवारी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.

एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याने मुलांनाही सोडलं नाही. पोलिसांनी घटनास्थळाला वेढा घातला आहे. पोलिसांनी अद्याप या हल्ल्याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य नोंदवलेलं नाही. 

'आरटीसीजी' या दूरचित्रवाणी वाहिनीनं सांगितलं की, सेंटिजे येथे एका बंदुकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात एक पोलिसासह सात जणांना जखमी केल्याचे वृत्त आहे. सेंटिजे देशाची राजधानी पॉडगोरिकापासून 36 किमी अंतरावर आहे.

अधिक वाचा-  ठाण्यात मोठी दुर्घटना, 5 मजली इमारतीचा भाग कोसळला

गोळीबारात 11 ठार

आरटीसीजीने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, हल्लेखोर रस्त्यावरील मुलांसह सर्व लोकांवर अंदाधुंद गोळीबार करत होता. जखमींपैकी चार जणांना सेटिंजे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोन गंभीर जखमींना पोडगोरिका येथील क्लिनिकल सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी परिसराला पूर्णपणे वेढा घातला. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

दरम्यान, राजधानी सेटिंजे येथे शुक्रवारी झालेल्या भीषण हत्याकांडानंतर मोंटेनिग्रोच्या सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. मोंटेनिग्रोचे अध्यक्ष मिलो डुकानोविक यांनी या घटनेला "अभूतपूर्व शोकांतिका" असे संबोधलं आहे.

त्यांनी ट्विट केले की, "ही एक अभूतपूर्व शोकांतिका आहे ज्याने संपूर्ण मोंटेनिग्रोला प्रभावित केले आहे. त्यामुळे मी सरकारला देशात एक दिवसाचा शोक जाहीर करण्याचे आवाहन करतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी