पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो - अमित शहा

...तर पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो; असे अमित शहा यांनी सांगितले. ते गोव्यातील धरबोंद्रा येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

More surgical strikes if Pakistan transgresses: Home Minister Amit Shah
पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो - अमित शहा 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो - अमित शहा
  • पाकिस्तान मर्यादेचे उल्लंघन करत असेल तर भारताला सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल - अमित शहा
  • भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास खपवून घेणार नाही - अमित शहा

धरबोंद्रा: पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो; असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. पाकिस्तानच्या भारत विरोधी कारवाया पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत. हे असेच सुरू राहणार असेल तर पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो; असे अमित शहा यांनी सांगितले. ते गोव्यातील धरबोंद्रा येथे एका कार्यक्रमात बोलत होते. More surgical strikes if Pakistan transgresses: Home Minister Amit Shah

पाकिस्तान दहशतवादी कारवायांना सतत मोठी मदत देत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी भारतात घुसखोरी करुन हिंसक कारवाया करत आहेत. दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये नागरिकांच्या हत्या सुरू केल्या आहेत. हे प्रकार थांबणार नसतील तर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावाच लागेल; असे अमित शहा म्हणाले. भारत देशविरोधी कारवाया सहन करणार नाही. जर पाकिस्तान मर्यादेचे उल्लंघन करत असेल तर भारताला सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल; असेही अमित शहा म्हणाले.

मागील काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांची तीव्रता वाढू लागली आहे. काश्मीरमध्ये नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. अलिकडेच दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार केला होता. या घटनांनंतर भारताच्या जवानांनी केलेल्या कारवाईत काही दहशतवादी ठार झाले. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला आहे. 

भारतीय सुरक्षा पथकांनी काही दहशतवाद्यांना ठार केले. तसेच दहशतवाद्यांचे समर्थक असलेल्या अनेकांची धरपकड झाली. या सर्वांच्या चौकशीतून ठिकठिकाणी धाडी टाकणे, जप्तीची कारवाई करणे सुरू आहे. ही कारवाई सुरू असतानाच अमित शहा यांनी सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यातील धरबोंद्रा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय गुन्हे विज्ञान विद्यापीठाची (नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी) कोनशिला ठेवली. यावेळी बोलताना अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन संरक्षणमंत्री दिवगंत मनोहर पर्रिकर यांच्या देखरेखीत सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे सांगितले. या कारवाईमुळे भारत हा एक सक्षम देश आहे आणि देशविरोधी कारवाया खपवून घेणार नाही हा संदेश जगभर पोहोचल्याचे अमित शहा म्हणाले. भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास खपवून घेणार नसल्याचे अमित शहा यांनी सांगितले. चर्चेची वेळ संपली आता ठोस प्रतिक्रियेतूनच उत्तर दिले जाईल; असेही अमित शहा म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी