2021 GST Collection : डिसेंबर महिन्यांत एक लाख २९ हजार कोटीहून अधिक जीसटी संकलन, गेल्या वर्षीच्या तुलनेत ११  टक्यांनी वाढीसह महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

2021 GST Collection डिसेंबर २०२१ मध्ये देशाचे सकल जीएसटी संकलन १ लाख २९ हजार ७८० कोटी रुपये झाले आहे. त्यात केंद्राकडे २२,५७८ कोटी रुपये, तर राज्यांचा २८,६५८ कोटी रुपये जमा झाले आहेत.  वस्तूंच्या आयातीवर वर आकारलेल्या कराच्या माध्यमातून ६९,१५५ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत.

थोडं पण कामाचं
  • डिसेंबर २०२१ मध्ये देशाचे सकल जीएसटी संकलन १ लाख २९ हजार ७८० कोटी रुपये झाले आहे.
  • वस्तूंच्या आयातीवर वर आकारलेल्या कराच्या माध्यमातून ६९,१५५ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा
  • महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

2021 GST Collection :नवी दिल्ली : डिसेंबर २०२१ मध्ये देशाचे सकल जीएसटी संकलन १ लाख २९ हजार ७८० कोटी रुपये झाले आहे. त्यात केंद्राकडे २२,५७८ कोटी रुपये, तर राज्यांचा २८,६५८ कोटी रुपये जमा झाले आहेत.  वस्तूंच्या आयातीवर वर आकारलेल्या कराच्या माध्यमातून ६९,१५५ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. (more than 1 lakha 29 thousand gst Revenue collection for December 2021 maharashtra highest in paid gst)

सरकारने नियमित तडजोडीचा भाग म्हणून केंद्राच्या जीएसटीपोटी २५,५६८ कोटी रुपये आणि राज्याच्याजीएसटीपोटी २१,१०२ कोटी रुपयांची तडजोड केली आहे. डिसेंबर २०२१ साठी केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी ४८,१४६ कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी ४९,७६० कोटी रुपये इतका आहे. डिसेंबर २०२१ मधील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा १३ टक्क्यांनी जास्त आहे आणि डिसेंबर २०१९ मधील जीएसटी महसुलापेक्षा २६ टक्क्यांनी जास्त आहे. डिसेंबर महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल ३६% टक्क्यांनी वाढला आहे. आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल २०२१ च्या तुलनेत डिसेंबर महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत  ५ टक्क्यांनी अधिक आहे. 

ऑक्टोबर, २०२१ ई वे बिल्स ७.४ कोटी इतके होते. डिसेंबर महिन्यात त्यात १७ टक्क्यांनी घट होऊन ६.१ कोटींवर आला आहे. डिसेंबर महिन्यातील जीएसटी संकलन १.३० लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे. सुधारित कर अनुपालन आणि केंद्र आणि राज्य या दोन्ही कर प्राधिकरणांच्या उत्तम कर प्रशासनामुळे हे संकलन झाले आहे. २०२१ आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत अनुक्रमे १.१० लाख कोटी आणि १.१५ लाख कोटी रुपयांच्या सरासरी मासिक संकलनाच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत १.३० लाख कोटी रुपयांचे सरासरी मासिक सकल जीएसटी संकलन झाले आहे. 

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने, करचुकवेगिरी विरोधात केलेल्या कारवाया, विशेषत: बनावट पावत्या देणाऱ्यांविरुद्धची कारवाई यामुळे जीएसटी संकलनात वाढ होत आहे.  उलट्या शुल्क संरचनेत सुधारणा करण्यासाठी परिषदेने केलेल्या दर तर्कसंगत करण्याच्या  विविध उपायांमुळेही महसुलात सुधारणा झाली आहे. अखेरच्या तिमाहीतही महसुलातील सकारात्मक कल कायम राहील अशी अपेक्षा आहे.


महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक १९,५९२ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. डिसेंबर २०२० मधील १७ हजार ६९९ कोटी रुपयांच्या तुलनेत ते ११ टक्क्यांनी जास्त आहे. गोवा राज्यात ५९२ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले असून डिसेंबर २०२० मधील  ३४२ कोटी रुपयांच्या तुलनेत ते ७३ टक्क्यांनी अधिक आहे. 


अनेक राज्यांचा जीएसटी घटला

महाराष्ट्राने जीएसटी संकलनात ११ टक्क्यांनी वाढ झाली असली तर अनेक राज्यांचा जीएसटी घटला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड राज्यात जीसटी संकलनाचा दर घटला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी