Nigeria Refinery Explosion: अबुजा : नायजेरियात एका बेकायदेशीर इंधन रिफायनरीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा अधिक असू शकते. ही आग इतकी भीषण आहे की आजूबाचा परिसर या आगीत भस्मसात झाला आहे. ही आग बेकायदेशीर असलेल्या इंधन भांडारातही पोहोचली आहे. या स्फोटामुळे मृत आणि जखमींचा नेमका आकडा अजून कळालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार नायजेरीयातील रिवर राज्यातील एका बेकायदेशीर इंधन डेपोत स्फोट झाला. या स्फोटात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात मृत पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवणेही कठीण झाले आहे, इतके ते होरपळले आहेत. एका इंधन रिफायनरीत अशा प्रकारे स्फोट होणे ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अशा प्रकारे अनेक स्फोट झाले असून त्यात शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी झालेल्या या स्फोटात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला आहे सांगणे कठीण असल्याचे सरकारने म्हटले आहे.
नायजेरियात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि गरीबी वाढली आहे. त्यामुळेच देशातील अनेक ठिकाणी अशा पकारे इंधन रिफायनरी सुरू करण्यात आल्या आहेत. मोठमोठ्या कंपन्या अशा रिफायनरीतून कच्चे तेल शुद्ध करतात आणि मोठ्या टाक्यांमध्ये हे तेल साठवतात. त्यात अशा प्रकारे स्फोट होतो आणि शेकडो जणांचा मृत्यू होतो.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अशाच प्रकारे एका बेकायदेशीर रिफायनरीत स्फोट झाला होता. त्या स्फोटात २५ जणांचा मृत्यू होता तसेच मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. या स्फोटामुळे शेजारील शेत आणि इतर भाग प्रदूषित झाला होता. इतकेच नाही तर या रिफायनरीतून बेकायदेशीर इंधन भरण्यासाठी आलेल्या अनेक गाड्यांनाही आग लागली होती. आफ्रिका खंडात नायजेरिया हा देश सर्वाधिक तेल उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे.