vaccination in India भारतात १३३ कोटींपेक्षा जास्त लसीकरण

More than 133 crore vaccination in India भारतात १३३ कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले. को-विन डॅशबोर्डनुसार देशात १ अब्ज ३३ कोटी १३ लाख ९९ हजार २२६ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले.

More than 133 crore vaccination in India
भारतात १३३ कोटींपेक्षा जास्त लसीकरण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतात १३३ कोटींपेक्षा जास्त लसीकरण
  • देशातील ८१ कोटी ६७ लाख ८ हजार २५० जणांना लसचा पहिला डोस
  • देशातील ५१ कोटी ४६ लाख ९० हजार ९७६ जणांना लसचा दुसरा डोस

More than 133 crore vaccination in India नवी दिल्ली: भारतात १३३ कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले. को-विन डॅशबोर्डनुसार देशात १ अब्ज ३३ कोटी १३ लाख ९९ हजार २२६ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ८१ कोटी ६७ लाख ८ हजार २५० जणांना लसचा पहिला डोस तर ५१ कोटी ४६ लाख ९० हजार ९७६ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला.

सर्वाधिक लसीकरण झालेल्या भारतातील राज्यांच्या यादीत उत्तरप्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तरप्रदेशमध्ये १७ कोटी ७२ लाख २७ हजार २९ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले तर महाराष्ट्रात १२ कोटी ३७ लाख ३६ हजार ५३९ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले.

भारतात ९२ हजार २८१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आढळलेल्या ३ कोटी ४६ लाख ९० हजार ५१० रुग्णांपैकी ३ कोटी ४१ लाख २२ हजार ७९५ जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ७५ हजार ४३४ जणांचा मृत्यू झाला.

कोरोना विषाणू सातत्याने स्वतःमध्ये बदल करत आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सध्या निवडक देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार ओमायक्रॉन सक्रीय झाला आहे. भारतातही ओमायक्रॉनची बाधा झालेले रुग्ण आढळले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे ओमायक्रॉनबाधीत आढळलेल्या देशातील रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली. वेळेत उपचार मिळाल्यामुळे देशातील अनेक ओमायक्रॉनबाधीत रुग्ण एक-दोन आठवड्यांत बरे झाले आहेत. 

कोरोना संकटाचा त्रास होऊ नये यासाठी पात्र नागरिकांनी नियमानुसार लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. मास्क वापरुन नाक-तोंड झाकावे. सॅनिटायझर वापरुन हात स्वच्छ करावे. सोशल डिस्टंस राखावा. वैयक्तिक आणि परिसराच्या स्वच्छतेवर भर द्यावा. कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी