Armed Force Vacancy : सशस्त्र दलात ८४ हजार पदं रिक्त, डिसेंबर २०२३ पर्यंत भरणार; केंद्र सरकारची माहिती

भारतीय सशस्त्र दलात ८४ हजार ६५९ पदं रिक्त आहेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत ही रिक्त पदं भरण्यात येणार असल्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे. भारतीय सशत्र दलांत एकूण ८४ हजार ६५९ पदं रिक्त असून त्यापैकी २७ हजार ५१० पदं ही सीआरपीएफमध्ये रिक्त आहेत.

indian armed force
सशस्त्र दल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय सशस्त्र दलात ८४ हजार ६५९ पदं रिक्त आहेत अशी केंद्र सरकारने दिली आहे.
  • डिसेंबर २०२३ पर्यंत ही रिक्त पदं भरण्यात येणार असल्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे.
  • भारतीय सशत्र दलांत एकूण ८४ हजार ६५९ पदं रिक्त असून त्यापैकी २७ हजार ५१० पदं ही सीआरपीएफमध्ये रिक्त आहेत.

 Armed Force Vacancy : नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलात(Indian Armed Forced)  ८४ हजार ६५९ पदं रिक्त (Vacancy) आहेत अशी माहिती केंद्र सरकारने (Central Government) दिली आहे. डिसेंबर २०२३ (December 2023) पर्यंत ही रिक्त पदं भरण्यात येणार असल्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Union Home State Minister Nityanand Rai) यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे.  (more than 84 thousand vacancy in armed forced government will fill by december 2023)

National Herald Case : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ED चा छापा, सोनिया-राहुल गांधी यांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई

संसदेत तीन सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्यमंत्री राय यांनी लिखित उत्तर दिले की,  भारतीय सशत्र दलांत एकूण ८४ हजार ६५९ पदं रिक्त असून त्यापैकी २७ हजार ५१० पदं ही सीआरपीएफमध्ये रिक्त आहेत. त्यानंतर बीएसफमध्ये २३ हजार ४३५ पदं रिक्त आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांत ११ हजार ७६५ पदं, सशस्त्र सीमा बलमध्ये ११ हजार १४३, आसाम रायफलमध्ये ६ हजार ४४ तर इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांत ४ हजार ७६२ पद रिक्त असल्याचे राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे. 

Russia Tourism : रशियाने उडवली अमेरिका-युरोपची खिल्ली, पर्यटनाच्या या व्हिडिओची जगभर चर्चा

४ ऑक्टोबर २०१२ रोजी निघालेल्या सूचनेनुसार सशस्त्र दलात माजी सैनिकांना १० टक्के आरक्षण असणार आहे. केंद्र सरकारने जून महिन्यातच लष्कर, नौदल आणि वायुसेनेतील सैनिकांची भरती प्रक्रियेसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. तसेच ज्यावेळी अग्नीवरची पहिली बॅच बाहेर पडेल त्यांनाही सशस्त्र दलांत भरती करताना १० टक्के आरक्षण देण्यात येईल. डिसेंबर २०२३ पर्यंत ही पदं भरण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे. आतापर्यंत २५ हजार २७१ पदांसाठी भरती सुरू झाली आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन सोबत करार पूर्ण करण्यात आल आहे. तसेच संस्था आणि आस्थापनांना ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Ayman-Al-Zawahiri : लादेनला भेटल्यानंतर डोळ्यांचा डॉक्टर कसा बनला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी...अयमान अल-जवाहिरीची जबरदस्त कहाणी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी