Most Powerful Passport : पासपोर्ट (Passport) हा प्रत्येक देशाच्या नागरिकत्वाचा आंतरराष्ट्रीय पुरावा (International Identity Card) असतो. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट अत्यावश्यक असतो. जगातील तमाम देशांच्या पासपोर्टचा विचार केला, तर त्यातील काही देशांचे पासपोर्ट हे इतर देशांपेक्षा अधिक शक्तीशाली (Powerful) आणि प्रभावशाली (Impressive) मानले जातात. जपान, (Japan) सिंगापूर (Singapore) आणि दक्षिण कोरिया (South Korea) या देशांच्या पासपोर्टना जगात सर्वाधिक प्रतिष्ठित मानलं जाऊ लागलं आहे. 2022 सालात ही बदललेली परिस्थिती आहे.
कोरोनापूर्व काळ आणि कोरोना नंतरचा काळ यात बराच फरक पडला आहे. हा फरक पासपोर्टच्या मानांकनातदेखील पडल्याचं दिसून आलं आहे. पासपोर्टच्या मानांकनात कोरोना काळापूर्वी युरोपीय देशांचा बोलबोला होता. मात्र कोरोनानंतर चित्र बदललं असून आता आशियायी देश यात बाजी मारत असल्याचं चित्र आहे.
जपानच्या पासपोर्टवर 193 देशांत सहज प्रवेश करता येणं शक्य आहे. सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या देशांचे पासपोर्टही तितकेच प्रभावी असून जपानपेक्षा केवळ एक कमी म्हणजेच 192 देशांत या पासपोर्टधारकांना सहज प्रवेश मिळू शकतो. रशियाचा पासपोर्टही शक्तीशाली मानला जातो. रशियन पासपोर्टला 50 वं मानांकन मिळालं असून या पासपोर्टवर 119 देशांत सहज प्रवेश करता येऊ शकतो. चीनला पासपोर्टच्या यादीत 69 वं स्थान मिळालं आहे. चीनच्या पासपोर्टच्या आधारे नागरिकांना 80 देशांमध्ये जाणं सहज शक्य होतं. तर भारताच्या पासपोर्टला 87 वं मानांकन मिळालं आहे. तर भारतापेक्षाही खालचं स्थान अफगाणिस्तानी पासपोर्टला मिळालं आहे. अफगाणी पासपोर्ट वापरून केवळ 27 देशांमध्येच जाता येऊ शकतं. हेन्ले अँड पार्टनर्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
2017 पूर्वीचा विचार करता टॉप 10 पासपोर्टच्या यादीत युरोपीय देशांचीच वर्णी लागत होती. मात्र आता चित्र बदललं आहे. जर्मनीच्या पासपोर्टपेक्षाही दक्षिण कोरियाचा पासपोर्ट अधिक प्रभावी ठरला आहे. युनायटेड किंगडम म्हणजेच युकेचा 187 देशांच्या या यादीत सहावा क्रमांक आहे. तर अमेरिेकाचा सातवा नंबर आहे.
अधिक वाचा - accident in Firozabad: गर्भवती महिलेला ट्रकची धडक, अपघातानंतर महिलेचं पोट फाटून बाळ आलं बाहेर
कुठल्या देशाचा पासपोर्ट किती प्रभावी आहे, याचा उपयोग जगातील गर्भश्रीमंत व्यक्तींना होत असतो. अनेक देश सध्या मोठ्या गुंतवणुकीच्या बदल्यात नागरिकत्व बहाल करतात. अशा परिस्थितीत कुठल्या देशाचा किती प्रभाव आहे, कुठल्या देशाच्या पासपोर्टवर किती देशांत व्हिसाशिवाय प्रवेश मिळू शकेल, या गोष्टींची चाचपणी करण्यासाठी हा डेटा उपयुक्त ठरतो. अर्थात, कोव्हिडनंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. भविष्यात वेगवेगळ्या देशांच्या आंतरराष्ट्रीय धोरणं आणि करारांवर पासपोर्टचं रँकिंग अवलंबून असणार आहे.