Five Color River : जमिनीवरचं आश्चर्यकारक सौंदर्य, या नदीत वाहतं पंचरंगी पाणी

निसर्गाएवढा मोठा जादूगार कुणीच नाही, असं म्हणतात. पाच रंगांचं पाणी ज्या नदीतून वाहतं, त्याकडे पाहिल्यावर याची प्रचिती येते.

Five Color River
या नदीत वाहतं पंचरंगी पाणी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • निसर्गाचा अद्बूत चमत्कार
  • नदीतून वाहतं पाच रंगांचं पाणी
  • म्हणतात पृथ्वीवर वाहणारं इंद्रधनुष्य

Five Color River | जगातील वेगवेगळ्या आश्चर्यांबाबत आपण ऐकलेलं असतं. अनेक सुंदर ठिकाणी पाहिलेली असतात, अनुभवलेली असतात. बऱ्याचशा ठिकाणांबाबत ऐकलेलं आणि वाचलेलं असतं. पावसाळा संपता संपता आकाशात सात रंगांचं इंद्रधनुष्य पाहून मन मोहरून जातं आणि सगळी दुःखं बाजूला होऊन प्रसन्न वाटू लागतं. आकाशातलं इंद्रधनुष्य पाहिलं नाही, असं या जगात कुणीच नसेल. मात्र इंद्रधनुष्यासारखीच एक नदीदेखील आपल्या पृथ्वीवर आहे आणि वेगवेगळ्या रंगाचं पाणी या नदीतून वाहत असतं, हे तुम्हाला माहित आहे का? ही नदी इतकी सुंदर आहे की पहिल्यांदा या नदीचा फोटो पाहताना तो फोटोशॉप केला आहे की काय, असा संशय तुम्हाला येईल. 

नदीत वाहतं पाच रंगांचं पाणी

हे वाचून कुणालाही आश्चर्य वाटतं, पण हे खरं आहे. या नदीतून पाच रंगांचं पाणी वाहत असतं. पृथ्वीवरची हे सर्वात रहस्यमय सौंदर्य आहे, असं म्हटलं जातं, ते त्यामुळेच. फोटो किंवा व्हिडिओ पाहिला तर ही नदी नकली आहे, असा कुणालाही संशय येणं स्वाभाविक आहे. आपण प्रत्यक्षात कधीही असा निसर्गाचा चमत्कार पाहिलेला नसतो. मात्र अनेकजण लाखो रुपये खर्च करून ही नदी पाहण्यासाठी जेव्हा जातात, तेव्हा त्यांना निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती मिळते. दक्षिण अमेरिकेतील कोलंबियात ही नदी आहे. जगभरातल्या पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या या नदीचं नाव आहे कॅनो क्रिस्टल्स. 

अधिक वाचा - Attack with Vegetable Chopper: संशय, हल्ला आणि बनाव! पोलिसांच्या सतर्कतेमुळे फुटले बिंग, पतीला पुराव्यासह अटक

पर्यटनाला चालना

केवल ही पाच रंगांची नदी पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक कोलंबियात येतात. या नदीत लाल, हिरवं, पिवळं, निळं आणि काळ्या रंगाचं पाणी दिसतं. एकाच वेळी या सर्व रंगांचं पाणी नदीतून वाहत असतं. अनेकदा पाऊस पडल्यानंतर नदीतील पाण्याचा रंग बदललेला आपण पाहतो. कधी खूप पाऊस झाल्यानंतर नदीचं पाणी गढूळ होतं, काही दिवसांनी ते शुद्ध दिसू लागतं. पण या नदीतील रंग असे बदलत नाहीत. तर एकाचवेळी पाच रंगाचं पाणी या नदीतून अविरत वाहत असतं. जणू काही एखादा कॅनव्हास आहे आणि त्यावरून वेगवेगळे रंग वाहत आहेत, असा भास या नदीकडे पाहताना होत राहतो. याच कारणामुळे या नदीला जगातील सर्वात सुंदर नदी म्हटलं जातं. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत जगभरातील अनेक पर्यटक या नदीच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी कोलंबियात गर्दी करत असतात.

अधिक वाचा - Operation All Out : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कामगिरी, ऑपरेशन ऑलआउट अंतर्गत 24 तासांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा

रंग बदलण्याचं कारण

या नदीच्या पाण्याचा रंग बदलण्यामागे खास कारण आहे. या नदीत एक विशिष्ट प्रकारचं झाड उगवतं. या झाडाचं नाव आहे मॅकेरेनिया क्लेविगरा. या झाडामुळेच पाण्याला वेगवेगळे रंग प्राप्त होतात. या रोपावर जेव्हा सूर्याचा प्रकाश पडतो, तेव्हा त्या ठिकाणचं पाणी वेगवेगळ्या रंगाचं दिसू लागतं. तीव्र आणि मंद प्रकाशात रंगांच्या वेगवेगळ्या शेड्स इथं पाहता येतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी