'हॉट डॉग' खाण्यास नकार दिल्याने २ वर्षाच्या मुलाची हत्या, आई आणि बॉयफ्रेंडने केलं भयंकर कृत्य

US Crime: एका आईनेच आपल्या पोटच्या २ वर्षाच्या मुलाला इतकी बेदम मारहाण केली ज्यामुळे मुलाचा मृत्यूच झाला. मुलाला मारहाण करण्याचं कारण देखील फारच शुल्लक असल्याचं समोर आलं आहे.

mother and her boyfriend kills 2 year old son after he refuses to eat hot dog
'हॉट डॉग' खाण्यास नकार दिल्याने २ वर्षाच्या मुलाची हत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • २ वर्षाच्या मुलाला आई आणि तिच्या बॉयफ्रेंडने केली बेदम मारहाण
  • मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
  • मुलाच्या आईला आणि बॉयफ्रेंडला दोषी ठरवून कोर्टाने सुनावली शिक्षा

वॉश्गिंटन: आई आणि मुलाचं नातं हे कायमच खूप खास असतं. मुलं ही आईच्या काळजाचा तुकडा असतात. पण आजच्या युगात जगात काही आशाही स्त्रिया आहेत की ज्यांच्या मनात मुलांसाठी काही भावनाच नसतात. त्यामुळे या नात्याला त्या अक्षरश: काळीमा फासत आहेत. असंच काहीसं उदाहरण अमेरिकेतील कन्सास शहरात पाहायला मिळालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने आपल्या अवघ्या २ वर्षाच्या मुलाचा फक्त यासाठी जीव घेतला कारण की, त्याने हॉट डॉग खाण्यास नकार दिला. महिलेने आपल्या मुलाला हॉट डॉग खाण्यासाठी दिला होता. पण त्याने तो खाण्यास नकार दिला. मुलाने दिलेल्या या नकारामुळे महिलेला एवढा राग आला की, तिने मुलाला बेदम मारहाण केली. 

तिने आपल्या मुलाला एवढी मारहाण केली त्याला अर्धमेल्या अवस्थेतच रुग्णालयात दाखल करावं लागलं. पण रुग्णालयात दोन दिवसांच्या उपचारानंतर त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वर्षाच्या त्या चिमुकल्याला फक्त त्याच्या आईनेच नाही तर तिच्या बॉयफ्रेंडने देखील मारहाण केली होती. मुलाला मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव एलिजाबेथ असं आहे तर तिच्या बॉयफ्रेंडचं नाव लुकास असं असल्याचं समजतं आहे. 

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी अशी माहिती दिली की, 'मुलाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर अतिशय वाईट पद्धतीने प्रहार करण्यात आले होते. जखमी अवस्थेतच मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल समोर आला असून मुलाच्या शरीरावर अगणित जखमा होत्या. त्याच्या शरीरातील अनेक हाडं तुटली होती. तसंच त्याच्या मेंदूला देखील सूज आली होती. 

याप्रकरणी आरोपी महिलेला १९ वर्ष ५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण तिच्या बॉयफ्रेंड मात्र, मुलाला आपण मारहाण केलं नसल्याचं म्हटलं आहे. पण त्याच्यावर देखील सेकेंड डिग्री मर्डर असा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यालाही कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. 

दरम्यान, मुलाच्या आजोबांनी असाही दावा केला आहे की, मुलाला आधी देखील मारहाण केली ज्यायची. त्यासाठी त्यांनी आधीही तक्रार दाखल केली होती. पण त्यावेळी कोणताही पुरावा नसल्याने मुलाच्या आईवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...