धक्कादायक! आजीवर प्रेम करतो म्हणून आईनं केली ६ वर्षांच्या मुलाची हत्या

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 10, 2020 | 20:36 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

जालंधरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका ३० वर्षीय महिलेनं आपल्या मुलाला चाकूनं भोसकून इमारतीवरून उडी मारली. या हत्येचं कारण अतिशय धक्कादायक आहे.

The 30-year-old accused's husband lives in Italy (Representative Image) Photo Credit: iStock Images
आजीवर प्रेम करतो म्हणून आईनं केली ६ वर्षांच्या मुलाची हत्या 

थोडं पण कामाचं

  • सोमवारी रात्री आरोपी महिलेनं स्वयंपाक घरातील चाकूनं आपल्या एकुलत्या एक मुलाला भोसकलं.
  • आपल्या ६ वर्षीय मुलाची हत्या केल्यानंतर महिलेनं घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्येचा केला प्रयत्न.
  • महिला जखमी झाली असून बचावली आहे.पण मुलाचा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी रस्त्यातच मृत्यू झाला.

जालंधर: एका ३० वर्षीय महिलेनं आपल्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. जालंधरच्या शहाकोट इथली ही घटना आहे. तिच्या या कृतीचं कारण तिनं आपल्या अवघ्या ६ वर्षांच्या मुलाला मारलं. ते ही स्वयंपाक घरातील चाकूनं भोसकून. या हत्येमागचं कारण खूपच धक्कादायक आहे. या महिलेला आपल्या मुलाबाबत भीती वाटत होती की, त्याचं आईपेक्षा आजीवर अधिक प्रेम आहे. आरोपीचं नाव कुलविंदर कौर असं सांगितलं जातंय.

आपल्या मुलाची हत्या केल्या नंतर कुलविंदर कौरनं आपल्या घरातील दुसऱ्या माळ्यावरून उडी मारून स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ही घटना घडली. सध्या महिलेवर नकोदर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिला जखमी झाली असून तिचा जीव वाचला आहे.

या ३० वर्षीय महिलेचा पती इटलीमध्ये राहतो. ती आपल्या सासू-सासऱ्यांसोबत आणि मुलासोबत जालंधर इथं राहत होती. आरोपी कौरचं तिची सासू चरणजीत कौर सोबत विशेष पटत नव्हतं. तसंच तिचा मुलगा आजी-आजोबांसोबत खूप वेळ घालवायचा. त्यामुळे कुलविंदरला खूप असुरक्षित वाटत होतं आणि मुलाचं आजी-आजोबांसोबत जास्त वेळ घालवणं तिला खटकत होतं.

आरोपी आईनं मुलाला चाकूनं भोसकलं

सोमवारी जेव्हा सर्वांनी रात्रीचं जेवण केलं. तेव्हा जेवणानंतर कुलविंदरचा ६ वर्षीय मुलगा आजी-आजोबांजवळ गेला. हे बघून कुलविंदरला प्रचंड राग आला आणि तिनं मुलाला आजी-आजोबांजवळून ओढून आणलं आणि आपल्या खोलीत नेलं. तिथं तिनं रागाच्या भरात मुलाच्या शरीरावर चाकूनं दोन वेळा वार केले.

६ वर्षीय मुलगा अर्शप्रीतचा रडण्याचा आवाज ऐकून आजी चरणजीत कौर आणि आजोबा दोघंही महिलेच्या खोलीत गेले. तेव्हा तिथं त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नातू दिसला. ६ वर्षीय नातवाला त्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

यानंतर महिलेनं तिच्या सासू-सासऱ्यांना आपणच मुलाला मारलं असं सांगितलं आणि घराच्या छतावरून खाली उडी मारली. शाहकोत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सुखविंदर सिंह यांनी सांगितलं की, त्यांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

आजोबा अवतार सिंहनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कुलविंदर कोर आणि चरणजीत कौर सतत भांडत असायच्या. घरातील कुठल्या ना कुठल्या विषयावर त्यांचं भांडण व्हायचं. तसंच नातू आमच्या जवळ खेळत असल्यानं सतत आमच्याजवळ येण्याची मागणी करत असल्यानं कुलविंदर अधिक चिडायची. 

कुलविंदर सिंह यांचं ७ वर्षांपूर्वी अवतार सिंह यांचा मुलगा सुरजित सिंह सोबत लग्न झालं होतं. सुरजित काही वर्षांपासून इटलीमध्ये सेटल झाला होता आणि सहा महिन्यांपूर्वी भारतात आला होता. आरोपी कुलविंदर विरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी