तीन मुलांच्या आईने केली प्रियकराच्या पत्नी आणि मुलीची हत्या

Murder Case: एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

murder
तीन मुलांच्या आईने केली प्रियकराच्या पत्नी आणि मुलीची हत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या प्रियकराच्या पत्नीची महिलेने केली हत्या
  • प्रियकराची पत्नी आणि त्यांच्या मुलीचीही महिलेने केली हत्या
  • आरोपी महिलेला पोलिसांनी केली अटक

अमृतसर: एका तीन मुलांच्या आईने आपल्या प्रियकराच्या पत्नीची आणि तिच्या सात वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने दोघींची हत्याच केली नाही तर त्यांचे मृतदेह थेट तलावात फेकून दिले. ही घटना पंजाबमधील अमृतसर येथे घडली आहे. आरोपी महिला ही विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. ही घटना काल (मंगळवार) रात्री अमृतसरमधील मोखमपुरा या परिसरात घडली. या घटनेमुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसला आहे. 

एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत अशी माहिती दिली की, आरोपी महिलेची ओळख पटली असून तिचं नाव कमलेश रानी असं आहे. तिचे आपला भाडेकरुन देव आनंद रॉयसोबत अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधामुळे कमलेश रानी हिने प्रियकराच्या पत्नीची आणि तिच्या मुलीची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.  

कमलेश रानी ही नेहमीच देव आनंद याची पत्नी सुमन हिच्यासोबत भांडण करायची. कारण की, सुमन ही दोघांच्या अनैतिक संबंधांना सतत विरोध करत होती. काल रात्री अचानक कमलेश रानी ही सुमनच्या घरात घुसली आणि थेट धारदार हत्याराने तिची हत्या केली. यावेळी सुमन हिच्या बाजूला तिची सात वर्षाची मुलगीही झोपली होती. पण आईच्या आवाजाने ती उठली आणि तिनेही मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. यावेळी कमलेश रानी हिने तिचीही निर्घृण हत्या केली. 

दरम्यान, रानी हिने दोघींचे मृतदेह तलावात फेकण्याआधी एक रिक्षा बोलावली होती. त्यानंतर ती तिथून रेल्वे स्टेशनला गेली. तिथूनच तिने आपला पती राम तीरथ याला फोन केला. पण राम तीरथने लागलीच पोलिसांना संपर्क साधला. राम तीरथ याने यावेळेस पोलिसांना असं सांगितलं की, त्याची पत्नी ही आपल्या तीन मुलांसह पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कमलेश रानी हिला अटक केली. 

अमृतसरचे पोलीस आयुक्त सुखचैन सिंह गिल यांनी आरोपी कमलेश रानी हिच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी सध्या पोलीस अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी अद्याप रिक्षा चालकाला मात्र अटक केलेली नाही. ज्याने आरोपी महिलेला सुमन आणि तिच्या मुलीचा मृतदेह तलावापर्यंत नेण्यास मदत केली. तसंच कमलेश रानीचा कथित प्रियकर देव आनंद रॉय याची देखील पोलिसांनी आतापर्यंत चौकशी केलेली नाही.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी