Crime News: आईच्या प्रियकराने घेतला होता मुलीचा जीव; आरोपीने पोलिसांसमोर उघड केले हत्येचे कारण

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 11, 2022 | 13:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Crime News In Delhi | दिल्लीतील प्रेम नगरमध्ये सहा वर्षांच्या निष्पाप मुलीचा मृत्यू आणि तिच्या बहीणीला आणि आईला जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने खुनाचा केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा आरोपी मृत मुलीच्या आईचा प्रियकर होता.

Mother's lover kills 6-year-old girl in Delhi
आईच्या प्रियकराने घेतला होता मुलीचा जीव, आरोपीने दिली कबुली   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आईच्या प्रियकराने घेतला ६ वर्षाच्या मुलीचा जीव.
  • आरोपी मृत मुलगीच्या आईचा प्रियकर होता.
  • नीरज असे आरोपीचे नाव आहे.

Crime News In Delhi | नवी दिल्ली : दिल्लीतील प्रेम नगरमध्ये सहा वर्षांच्या निष्पाप मुलीचा मृत्यू आणि तिच्या बहीणीला तसेच आईला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने खुनाचा केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा आरोपी मृत मुलीच्या आईचा प्रियकर होता. आरोपीने पोलिसांना सांगितले की, मुलीच्या आईने आपल्याशी संबंध तोडले होते, याचा राग असल्यामुळे त्याने सर्वांना मारहाण केली. यादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे किरारी येथील घरातून एक महिला आणि दोन मुली रक्ताच्या अवस्थेत सापडल्या होत्या त्यापैकी एका मुलीचा मृत्यू झाला होता. (Mother's lover kills 6-year-old girl in Delhi). 

अधिक वाचा : या ऑप्टिकल इल्युजनमधील सर्व प्राणी तुम्ही ओळखू शकता का?

पोलिसांचा संशय खरा ठरला

पोलिसांना सुरूवातीपासूनच घटनेपासून फरार असलेल्या कुटुंबातील जवळच्या नातेवाईकावर संशय होता. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्रने आठ वर्षांपूर्वी शीतलसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना सहा वर्षांची लक्ष्मी आणि दोन वर्षांची नयनी या दोन मुली आहेत. सहा महिन्यांपूर्वीच हे कुटुंब किरारी येथील इंद्रा एन्क्लेव्हमध्ये राहायला आले होते. धर्मेंद्र बेलदरी आणि शीतल हे घरातील साफसफाईचे काम करतात. दोन महिन्यांपूर्वी धर्मेंद्रच्या गावातील नातेवाईक नीरज त्यांच्या शेजारी राहायला आला होता. नीरजची घरात सतत ये-जा असायची. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, धर्मेंद्र आणि नीरज यांनी मंगळवारी रात्री खूप दारू पिली होती तसेच त्या रात्री ते घरीही परतले नव्हते. 

उपचारादरम्यान निष्पाप मुलीचा मृत्यू 

बुधवारी सकाळी शीतलचा भाऊ घरी आला असता त्याला दोन्ही भाची व बहीण खोलीत रक्ताने भरलेल्या अवस्थेत दिसली. यानंतर सर्व जखमींना संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून सर्वांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान सहा वर्षीय लक्ष्मीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आधी खुनाचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल केला होता मात्र मुलीच्या मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तपासात सहभागी असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने मुलींना धक्काबुक्की केली होती. याशिवाय शीतलला लाथा-बुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली आहे. बाळाच्या नाकाचे हाडही तुटले आहे. आता या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तीला अटक केल्यानंतरच हत्येचे खरे कारण समोर येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी