Indoor Rape Case : पती दाखवायचा अश्लील व्हिडीओ, न्युड डान्स करायला लावून ठेवायचा अनैसर्गिक संबंध

मध्य प्रदेशमध्ये एका महिला शिक्षिकेवर चार आरोपींनी सामूहिक बलात्कार केला आहे. इतकेच नाही तर नराधम आरोपीने आपल्याच पत्नीवर अनन्वित अत्याचार केले असून तिचे हाल हाल केले आहे. आरोपी पत्नीला अश्लील व्हिडीओ दाखवायचा, तिला विवस्त्र करून नाचायला लावायचा तसेच तिच्यावर अनैसर्गिक शारिरीक संबंधही ठेवायचा.

थोडं पण कामाचं
  • मध्य प्रदेशमध्ये एका महिला शिक्षिकेवर चार आरोपींनी सामूहिक बलात्कार केला आहे.
  • नराधम आरोपीने आपल्याच पत्नीवर अनन्वित अत्याचार केले
  • तिला विवस्त्र करून नाचायला लावायचा आणि अनैसर्गिक शारिरीक संबंधही ठेवायचा.

Indoor Rape Case : भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये एका महिला शिक्षिकेवर चार आरोपींनी सामूहिक बलात्कार केला आहे. इतकेच नाही तर नराधम आरोपीने  आपल्याच पत्नीवर अनन्वित अत्याचार केले असून तिचे हाल हाल केले आहे. आरोपी पत्नीला अश्लील व्हिडीओ दाखवायचा, तिला विवस्त्र करून नाचायला लावायचे तसेच तिच्यावर अनैसर्गिक शारिरीक संबंधही ठेवायचा. अखेर या प्रकरणी पोलिसांनी चारही आओपीला अटक केली आहे. 

पीडितेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी पोलिसांना सांगितली. आरोपी राजेश विश्वकर्मा हा व्यवसायाने बिल्डर असून त्याने इंदूरमध्ये एक फार्महाऊस बनवले होते, या फार्महाऊसवर पत्नीला ठेवून विश्वकर्मा आणि त्याचे साथीदार तिच्यावर अत्याचार करत होते. राजेश विश्वकर्मा पत्नीला मोठ्या स्क्रीनवर अश्लील व्हिडीओ दाखवायचा. इतकेच नाही तर आपल्या आपल्या मित्रांना बोलवून महिलेला निर्वस्त्र करून नाचायला लावायचा.   


सामूहिक बलात्कार

पत्नीने या सगळ्यांना विरोध केल्यास राजेश विश्वकर्मा सिगारेट्सचे चटके द्यायचा, तिला मारहाण करून चावायचा. पत्नीला विवस्त्र करून तिला नाचायला लावायचा त्यानंतर पती आणि त्याचे साथीदार तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करायचा, इतकेच नाही तर नराधम आरोपी कधी कधी महिलेवर सामूहिक बलात्कार करायचे. हे करत असताना तिचे व्हिडीओ आणि फोटो काढायचे. याबद्दल कुठे वाच्यता केल्यास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती.

नोकराकडूनही अत्याचार

फक्त पतीच आणि त्याचे मित्रच नाही तर फार्महाऊसमधला नोकरही महिलेवर अत्याचार करायचा. नोकर महिलेचे कपडे लपवून ठेवायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. पीडितेने आपल्या माहेरच्या लोकांना काही सांगू नये म्हणून त्याच्या उपस्थित तो फोन करण्याची परवानगी द्यायचा. फार्महाऊसवर सीसीटीव्ही लावून २४ तास महिलेवर नजर ठेवली जात होती. या फार्महाऊसवर राजेश विश्वकर्माच्या परवानगीशिवाय एक चिटपाखरूही आत येत नव्हतं. 

चार आरोपींना अटक 

पीडित महिलेने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, त्यानुसार पोलिसांनी आरोपी बिल्डर राजेश विश्वकर्मा आणि त्याचे साथीदार विवेक, विपीन आणि अंकेशला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी