Mumbai Terror Threat: मुंबई पोलिसांना हल्ल्याची धमकी देणारा सूत्रधार कतारमध्ये, यूपी कनेक्शनही समोर

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 24, 2022 | 10:50 IST

Mumbai Police Threatened: मुंबई शहरात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याचा मेसेज (message) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाला. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली.

Mumbai Police Received  Threatening Message
मुंबईत २६/११ सारख्या हल्ल्याचा धोका, दोहा आणि पाकिस्तानचे कनेक्शन  
थोडं पण कामाचं
  • मुंबई शहरात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याचा मेसेज (message) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाला.
  • या प्रकरणात गुन्हे शाखेला दोहा (Doha)येथे राहणाऱ्या अनिश (Anish) नावाच्या व्यक्तीवर संशय आहे.
  • या प्रकरणा संदर्भातली सर्व माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे.

मुंबई: Mumbai 26/11 Terror Threat Message:  काही दिवसांपूर्वी मुंबई शहरात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याचा मेसेज (message) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाला. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान आता यासंदर्भातली मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेला दोहा (Doha)येथे राहणाऱ्या अनिश (Anish) नावाच्या व्यक्तीवर संशय आहे. तर  मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज करण्यात आलेला मोबाईल नंबर हा पाकिस्तानातील  असल्याची माहिती समोर आली आहे. एबीपी न्यूजनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. 

एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, ज्या फोन नंबरवरून हा मेसेज आला तो पाकिस्तानचा आहे, तर ज्या आयपी अॅड्रेसचा वापर करून इंटरनेटवरून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्यात आला होता तो दुसऱ्या देशाचा आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणासंदर्भातली सर्व माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. 

अधिक वाचा- खेळण्याचा नाद जीवावर ,मामाकडे शिकायला आलेल्या 5वीतल्या मुलाचा बुडून मृत्यू

या व्यक्तीवर संशय

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चनं उत्तर प्रदेश एटीएसशी समन्वय साधत आहे. युपी एटीएसच्या सहकार्याने गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.  एक टीम उत्तर प्रदेशला रवाना झाली आहे. चौथ्या व्यक्तीला पकडण्यासाठी दुसरी टीम हरियाणामध्ये आहे. दोहा येथे राहणाऱ्या अनीस नावाच्या व्यक्तीवरही पोलिसांना संशय आहे. त्याने यापूर्वीही अशाच धमक्या दिल्या होत्या. 

Whatsapp ला पाठवलं पत्र 

क्राईम ब्रान्चनं व्हॉट्सअॅपला पत्र लिहिलं आहे. जेणेकरून त्या नंबरचा रिअल टाइम आयपी अॅड्रेस काढता येईल आणि असे मेसेज कोणत्या देशात पाठवले गेले आहेत हे कळू शकेल. त्यामुळे क्राईम ब्रान्चनं व्हॉट्सअॅपला त्याचा रिअल-टाइम आयपी अॅड्रेस देण्याची मागणी पत्रात केली आहे.  

उत्तर प्रदेशातले फोन नंबर 

उल्लेख केलेले सात फोन नंबर उत्तर प्रदेशातल्या बिजनौरचे असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यापैकी 4 जणांचा मुंबई पोलिसांनी शोध घेऊन चौकशी सुरू केली आहे. उर्वरित तीन क्रमांक बराच काळ वापरात नसल्याचं समजतंय.

पोलिसांनी टेलिकॉम कंपनीकडून या क्रमांकांची माहिती मागवली असल्याचंही  सूत्रांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वसईत आम्ही ज्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही.

यूपी आणि हरियाणा कनेक्शन 

उत्तर प्रदेशात मुंबई क्राईम ब्रँचचं गेलेलं एक पथक यूपी एटीएसने पकडलेल्या दोघांची चौकशी करणार आहे. याशिवाय एक पथक हरियाणाला गेले असून तेथे चौथ्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडलेले हे चार जण, ज्यांचे नंबर अज्ञात व्यक्तीने ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप नंबरवर शेअर केले होते. 

अधिक वाचा- Amitabh Bachchan: बिग बींनी 11.25 मि. केलं महत्त्वाचं Tweet, दिली स्वतःची Health Update

सूत्रांनी पुढे सांगितले की, कतारमधील दोहा येथे बसलेला अनिश कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रान्च केंद्रीय यंत्रणांसोबत काम करत आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी