Mumbai to Shirdi Vande Bharat Express। साई भक्तांसाठी आनंदाची बातमी ; एका दिवसात करता येणार मुंबई टू शिर्डी रिटर्न प्रवास, Check ticket Price

Mumbai To Shirdi Vande Bharat Express : मुंबईतून लवकरच 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहे. पहिली ट्रेन मुंबई सीएसएमटी ते साई नगरी शिर्डी आणि दुसरी ट्रेन मुंबई सीएसएमटी ते सोलापूरला जाणार आहे.

Mumbai to Shirdi return journey can be done by Vande Bharat Express in one day, Check Price ticket
Vande Bharat Express । साई भक्तांसाठी आनंदाची बातमी ; एका दिवसात करता येणार मुंबई टू शिर्डी रिटर्न प्रवास, Check ticket Price  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • PM मोदी 10 फेब्रुवारीला वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवू शकतात.
  • मुंबईहून 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार
  • पहिली ट्रेन मुंबई सीएसएमटी ते साई नगरी शिर्डी आणि दुसरी ट्रेन मुंबई सीएसएमटी ते सोलापूरला जाणार

Mumbai To Shirdi  Vande Bharat Express in marathi : मुंबई ते शिर्डी दरवर्षी जाणाऱ्या लाखो साई भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबई ते शिर्डी दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर होणार आहे. मध्य रेल्वे या मार्गावर वंदे भारत गाड्या सुरू करणार आहे. लवरकरच मुंबईहून 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिली ट्रेन मुंबई सीएसएमटी ते साई नगरी शिर्डी आणि दुसरी ट्रेन मुंबई सीएसएमटी ते सोलापूरला जाणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. (Mumbai to Shirdi return journey can be done by Vande Bharat Express in one day, Check Price ticket)

अधिक वाचा : Aditya Thackeray यांच्या गाडीवर हल्ला ; औरंगाबादमध्ये नेमकं काय झालं?

सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत सेवा १९ जानेवारीपासून सुरू होणार होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत गाड्यांना झेंडा दाखविण्याच्या सोहळ्याला पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मिळणे बाकी आहे, परंतु सीआर अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली असून सीआर अधिकाऱ्यांनी रविवारी सीएसएमटीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

अधिक वाचा : घरच्यांकडून कुटुंबातील बेपत्ता सदस्यावर अंत्यसंस्कार; नंतर सोशल मीडियातून मृत व्यक्ती प्रकटला, असं कसं घडलं ? पडला प्रश्न

वंदे भारत एक्स्प्रेसला मुंबई ते शिर्डी अंतर कापण्यासाठी 5 तास 20 मिनिटे आणि मुंबई ते सोलापूर अंतर कापण्यासाठी 6 तास 30 मिनिटे वेळ लागेल. रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, रेल्वेने निश्चित केलेल्या सुरुवातीच्या भाड्यात IRCTC खाद्यपदार्थांचा समावेश नाही. त्यामुळे चहा-नाश्त्यासाठी अधिक रुपये खर्च करावे लागत आहेत. मुंबई-सोलापूर 'वंदे भारत' एक्स्प्रेस मुंबईहून संध्याकाळी 4.10 वाजता सुटेल आणि पुण्यात 7.10 वाजता पोहोचेल; रात्री 10.40 वाजता सोलापूरला मुक्काम असेल. सोलापूरहून परतीचा प्रवास सकाळी 6.05 वाजता सुरू होऊन पुण्याला सकाळी 9.00 वाजता आणि सीएसएमटीला दुपारी 12.35 वाजता पोहोचेल. शिर्डी येथे एका दिवसात 'वंदे भारत' ही गाडी सीएसएमटीहून सकाळी 6.15 वाजता सुटेल आणि दुपारी 12.10 वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास संध्याकाळी 5.25 वाजता सुरू होईल आणि रात्री 11.18 वाजता मुंबईला पोहोचेल. यामुळे साईभक्तांना एका दिवसात त्यांच्या घरी जाता येणार आहे.

अधिक वाचा : BMC Recruitment 2023: मुंबई मनपात नोकरीची संधी; आजच करा अर्ज, जाणून घ्या कोणत्या पदासाठी आणि कसा करायचा अर्ज

मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेससाठी पुण्यापर्यंत चेअर कार कोचमध्ये ५६० रुपये आणि सोलापूरसाठी ९६५ रुपये मोजावे लागणार आहेत. एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 1,135 रुपये आणि संपूर्ण मुंबई-सोलापूर प्रवासासाठी 1,970 रुपये. नाशिकरोडसाठी मुंबई-साईनगर शिर्डी 'वंदे भारत' चेअर कारचे तिकीट 550 रुपये आणि शिर्डीसाठी 800 रुपये आहे. एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी अनुक्रमे 1150 आणि 1630, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.  वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट ttps://www.irctc.co.in/nget/train-search या साईटवर जाऊन बुक करु शकता. 

सध्या मुंबईहून गुजरातची राजधानी गांधीनगरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू आहे. वंदे भारत एक्सप्रेस जास्तीत जास्त २०० किमी प्रतितास वेगाने धावण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. मात्र, या वेगाने धावण्यासाठी रेल्वे ट्रॅक योग्य नाहीत, त्यामुळे वंदे भारत गाड्या ताशी 130 किमी वेगाने धावल्या जात आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी