Munger firing: संजय राऊत म्हणाले- मुंगेरची घटना हा हिंदुत्वावर हल्ला, भाजपा नेते प्रश्न का विचारत नाहीत?

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 30, 2020 | 12:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात सोमवारी रात्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनावरून झालेल्या वादावादीवरून पोलिसांनी केलेल्या गोळीबाराबाबत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut
Munger firing: संजय राऊत म्हणाले- मुंगेरची घटना हा हिंदुत्वावर हल्ला, भाजपा नेते का विचारत नाहीत प्रश्न  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • मुंगेरमध्ये दुर्गादेवीच्या विसर्जनादरम्यान झालेल्या गोळीबाबत सेनेचा हल्लाबोल
  • शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले- भाजपा आता का विचारत नाही प्रश्न
  • मुंगेरची घटना हा हिंदुत्वावरचा हल्ला आहे- संजय राऊत

नवी दिल्ली: बिहारच्या (Bihar) मुंगेर जिल्ह्यात (Munger district) सोमवारी रात्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनावरून (Durgadevi idol immersion) झालेल्या वादावादीवरून (clashes) पोलिसांनी केलेल्या गोळीबाराबाबत (police firing) शिवसेनेने भाजपावर निशाणा (Shivsena attacks BJP) साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी या घटनेला हिंदुत्वावरचा हल्ला (attack on Hindutva) म्हटले आहे. भाजपावर हल्ला चढवत त्यांनी म्हटले आहे की या घटनेबद्दल भाजपाच्या नेत्यांनी अजून मौन का (why BJP is silent?) पाळले आहे?

काय म्हणाले संजय राऊत?

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘मुंगेरचा गोळीबार हा हिंदुत्वावर हल्ला आहे. जर अशी घटना महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा राजस्थानमध्ये झाली असती तर राज्यपाल आणि भाजपा नेत्यांनी राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली असती, पण बिहारचे राज्यपाल आणि भाजपा नेते आता का प्रश्न विचारत नाहीत?’ तर पुलवामा हल्ल्याबाबत पाकिस्तानी मंत्र्यांच्या कबुलीवर त्यांनी म्हटले, ‘पाकिस्तान सरकार किंवा पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना ज्या काश्मीरमध्ये कार्यरत आहेत त्यांच्याशिवाय यात इतर कुणीही असू शकत नाही. पाकिस्तानचे खासदार जे म्हणत आहेत ते खरे आहे.’

एका व्यक्तीचा झाला मृत्यू

मुंगेर जिल्ह्यात सोमवारी रात्री दुर्गादेवीच्या विसर्जनावरून झालेल्या वादात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गुरुवारी पोलीस अधिक्षक कार्यालयासह शहरातील इतर ठिकाणी तोडफोड करण्यात आली आणि वाहनेही जाळण्यात आली. तर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी राजेश मीना आणि पोलीस अधिक्षक लिपी सिंह यांना तात्काळ हटवण्यासोबतच मगध प्रमंडलाचे आयुक्त असंगबा चुबा एरो यांना संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

विरोधी पक्षांचा हल्लाबोल

मुंगेरच्या घटनेवरून विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर हल्ला करत आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी राज्यातील नितीश कुमार सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘या प्रकरणाची पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. कोणाच्या इशाऱ्यावर गोळ्या चालवल्या गेल्या? कुणीतरी आदेश दिले असतीलच. कुणाच्या आदेशाशिवाय गोळ्या चालणार नाहीत.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी