Karnataka : खुनाच्या आरोपीला गर्लफ्रेंडसोबत सोडलं लॉजमध्ये, घटना उघड झाल्यावर बडे अधिकारीही हादरले

खुनाच्या आरोपीला कोर्टातून परत नेताना गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवण्यासाठी लॉजवर सोडण्यात आलं. ही घटना उघडकीला आल्यावर कर्नाटक पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Karnataka
खुनाच्या आरोपीला गर्लफ्रेंडसोबत सोडलं लॉजमध्ये  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • खुनाच्या आरोपीला सोडलं गर्लफ्रेंडसोबत
  • लॉजवर दिली काही वेळ घालवण्याची वेळ
  • बेजबाबदार पोलिसांवर गुन्हा दाखल

Karnataka : खुनाची शिक्षा (Murder Accused) भोगणाऱ्या आरोपीला कोर्टातून (Court) तुरुंगात (Jail)  नेत असताना काही वेळ एका लॉजमध्ये (Lodge) सोडण्यात आल्याची घटना कर्नाटकमध्ये (Karnataka) घडली आहे. याला जबाबदार असणाऱ्या पोलिसावर गुन्हा (FIR on police) दाखल कऱण्यात आला असून त्याच्याविरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली आहे. पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील छुप्या साट्यालोट्याची अनेकांना कल्पना असते. छोट्यामोठ्या फायद्यांसाठी अनेक पोलीस गुन्हेगारांना झुकतं माप देत असल्याच्या घटना उघडकीला येत असतात. मात्र कर्नाटकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. 

अशी घडली घटना

कर्नाटकच्या बेल्लारीमध्ये खुनाचा आरोपी बच्चा खानची धारवाडच्या कोर्टात हजेरी होती. त्याला घेऊन पोलीस स्टेशनची एक टीम धारवाडला गेली होती. कोर्टातील कामकाज संपल्यानंतर थेट पोलीस स्टेशनला येण्याऐवजी पोलिसांनी वेगळाच मार्ग अवलंबला. बच्चा खानच्या गर्लफ्रेंडने धारवाडमधील लॉजमध्ये एक खोली बुक केली होती. बच्चा खानपर्यंत हा निरोप पोहोचवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस बच्चा खानला घेऊन या लॉजकडे गेले आणि काही वेळ आपल्या गर्लफ्रेंडसोबत एकत्र घालवण्याची परवानगी पोलिसांनी या खुनाच्या आरोपीला दिली. बच्चा खान लॉजमधील आपली गर्लफ्रेंड असलेल्या रुममध्ये गेला आणि पोलीस बाहेर थांबले.

लॉजला पोलीस धावणीचं रुप

लॉजमध्ये जणू काही एखादी व्हीव्हीआयपी व्यक्ती असावी, अशा थाटात पोलीस लॉजच्या बाहेर उभे राहून पहारा देत होते. काही पोलीस रस्त्यावर तर काही पोलीस बच्चा खान असलेल्या रुमच्या बाहेर पहारा देताना दिसले. 

अधिक वाचा - ISIS च्या दहशतवाद्याला रशियात अटक, भारतात  भाजप नेत्यावर आत्मघातकी हल्ल्याची होती योजना 

दुसरे पोलीस हजर

आरोपी बच्चा खान पोलीस स्टेशनऐवजी एका लॉजमध्ये दाखल झाल्याची माहिती विद्यागिरी पोलिसांना मिळाली. कदाचित पोलिसांना चुकवून आरोपी पळून गेला असावा, असे समजून विद्यागिरी पोलीस सर्व तयारीनिशी त्याला अटक करण्यासाठी लॉजवर पोहोचले. पोलिसांची टीम आल्याचं पाहून तिथं असणाऱ्या टीमचा गोंधळ उडाला आणि काय करावं, हेच त्यांना समजेना. विद्यागिरी पोलिसांनी थेट लॉजमध्ये आरोपी बच्चा खान असलेल्या खोलीत धडक मारली आणि आपल्या गर्लफ्रेंडसोबत मजामस्तीत रमलेल्या बच्चाला अटक केली. त्याच्यासोबत त्याच्या गर्लफ्रेंडलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. हा प्रकार पाहून कर्तव्यावर असणाऱ्या मूळ पोलिसांचा गोंधळ उडाला आणि त्यांचं पितळ उघडं पडलं. 

अधिक वाचा - Jammu Kashmir: घुसखोरीसाठी दहशतवाद्यांनी तयार केला बोगदा, सुरक्षा दलाकडून उद्ध्वस्त

कर्नाटकात खळबळ

विद्यागिरी पोलिसांनी घडलेल्या घटनेचे जसंच्या तसं वृत्त वरिष्ठांना दिलं आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली. बच्चा खानला पुन्हा बेल्लारीला नेण्याऐवजी त्याला लॉजवर जाण्याची परवानगी देणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसच कायदा मोडून आरोपीची बडदास्त ठेवणार असतील, तर सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवर कसा विश्वास राहिल, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी