Jharkhand: मुस्लिम समाजा'ने 50 दलित कुटुबांना काढलं गावाबाहेर, जंगलात राहण्यास पाडलं भाग; राज्यपालांनी अहवाल मागवला

 झारखंडमधील (Jharkhand) पलामूमध्ये दलित  (Dalit)वर्गातील सुमारे 50 कुटुंबाना (families ) त्यांचे गाव सोडून जंगलात राहण्यास भाग पाडले जात आहे. मुस्लिम समाजातील (Muslim community) लोकांनी मारहाण करून त्यांना त्यांच्या गावातून हाकलून दिल्याचा आरोप दलित समाजातील लोकांनी केला आहे. याबाबत पोलिसांत (police) तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

50 Dalit families were expelled from the village by the Muslim community
मुस्लिम समाजा'ने 50 दलित कुटुबांना काढलं गावाबाहेर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या घटनेसंदर्भात 12 नामांकित आणि 150 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
  • या गावातील सर्व 50 कुटुंबांचे प्राधान्याने पुनर्वसन करण्याचे आश्वासन राज्यापालांनी दिले आहे.

पलामू :  झारखंडमधील (Jharkhand) पलामूमध्ये दलित  (Dalit)वर्गातील सुमारे 50 कुटुंबाना (families ) त्यांचे गाव सोडून जंगलात राहण्यास भाग पाडले जात आहे. मुस्लिम समाजातील (Muslim community) लोकांनी मारहाण करून त्यांना त्यांच्या गावातून हाकलून दिल्याचा आरोप दलित समाजातील लोकांनी केला आहे. याबाबत पोलिसांत (police) तक्रारही दाखल करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनीही याप्रकरणी अहवाल मागवला आहे.याआधी झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील एका मुस्लीम बहुल गावातील शाळेत प्रार्थाना म्हणण्यास विरोध केला होता. आता मुस्लीम समुदयाने दलित लोकांना गावातून बाहेर काढलं आहे. 

झारखंड पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, याबाबत माहिती मिळताच मेदिनीनगरचे एसडीओ राजेश कुमार शाह आणि एसडीपीओ सुजित कुमार मारुमातू गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या टोंगरी हिल भागात पोहोचले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तेथे तळ ठोकून आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेसंदर्भात 12 नामांकित आणि 150 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची दखल घेत झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे.

Read Also : स्विमिंग पूलमध्ये पोहताना 19 वर्षीय युवकाचा मृत्यू

राज्यपालांनी मागवला अहवाल 

राजभवनातून जारी केलेल्या निवेदनानुसार, राज्यपालांनी पलामूचे उपायुक्त ए दोड्डे यांना दोन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दोड्डे म्हणाले की, पोलिसांना दोषींना तात्काळ पकडण्यास सांगितले आहे. या गावातील सर्व 50 कुटुंबांचे प्राधान्याने पुनर्वसन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कामासाठी मदत संस्था सक्रिय झाल्या आहेत, असे ते म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी