Muslim Fruit Vendor : कर्नाटकात हनुमान मंदिरासमोर मुस्लिम व्यक्ती विकत होता टरबूज, हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फेकली फळं

कर्नाटकात एका हनुमान मंदिरासमोर एक मुस्लिम वृद्ध व्यक्ती टरबूज विकत होता. तेव्हा हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी या वृद्ध व्यक्तीला हटकले आणि त्याची सर्व फळांची नासधूस करून रस्त्यावर फेकली. तेव्हा पोलीसही यावेळी हजर होते. परंतु त्यांनी काहीच केले नाही. हिजाब प्रकरणी ही प्रतिक्रिया असल्याचे वक्तव्य मंत्र्यांनी केले आहे.

Muslim fruit vendor
कर्नाटक मुस्लिम फळ विक्रेता  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • कर्नाटकात एका हनुमान मंदिरासमोर एक मुस्लिम वृद्ध व्यक्ती टरबूज विकत होता.
  • तेव्हा हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी या वृद्ध व्यक्तीला हटकले आणि त्याची सर्व फळांची नासधूस करून रस्त्यावर फेकली.
  • तेव्हा पोलीसही यावेळी हजर होते. परंतु त्यांनी काहीच केले नाही.

Muslim Fruit Vendor : धारवाड : कर्नाटकात एका हनुमान मंदिरासमोर एक मुस्लिम वृद्ध व्यक्ती टरबूज विकत होता. तेव्हा हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी या वृद्ध व्यक्तीला हटकले आणि त्याची सर्व फळांची नासधूस करून रस्त्यावर फेकली. तेव्हा पोलीसही यावेळी हजर होते, परंतु त्यांनी काहीच केले नाही. हिजाब प्रकरणी ही प्रतिक्रिया असल्याचे वक्तव्य मंत्र्यांनी केले आहे. तसेच अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही आणि अशा लोकांविरोधात कारवाई केली जाईल अशी माहिती कायदेमंत्री माधु स्वामी यांनी दिली आहे. 

कर्नाटकच्या धारवाडमध्ये एका हनुमान मंदिरासमोर एक वृद्ध मुस्लिम व्यक्ती टरबूज विकत होता. तेव्हा हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी विचारपूस केली आणि त्याची फळे रस्त्यावर फेकून दिली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. यापूर्वी राज्यात हलाल मीट वरून राज्यात गदारोळ झाला होता. शिवमोगामध्ये या वरून मारहाण झाली तसेच मुस्लिम व्यापार्‍यांवर बहिष्कार घालावा असे आवाहनही करण्यात आले होते. असे असले तरी या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस तक्रार दाखल करण्यास हयगय करत असल्याचे पीडित व्यक्तींनी म्हटले आहे. 


सामाजिक कार्यकर्ते जिया नोमानी म्हणाले की यासाठी आम्ही इन्स्पेक्टरला भेटलो आणि नंतर पोलीस कमिश्नर यांनाही भेटलो. त्यानंतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना भेटल्यानंतरही गुन्हा दाखल झाला नाही, म्हणून आम्ही कोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याचे नोमानी यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी