Mustakim and Naeem arrested for saying 'Pakistan Zindabad' : नवी दिल्ली : भारतात 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हणणाऱ्या मुस्तकीम आणि नईम या दोघांना अटक करण्यात आली. एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून कारवाई केली. मुस्तकीम आणि नईम हे दोघे मध्य प्रदेशमधील बरेलीच्या सिंघाई मुतावन गावातले आहेत.
एका दुकानात बसलेले मुस्तकीम आणि नईम मोठ्या आवाजात 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा देत होते. या मुद्यावरून त्यांना हटकणाऱ्यांना मुस्तकीम आणि नईम या दोघांनी धमकी दिली. संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत मुस्तकीम आणि नईम यांनी दिलेल्या घोषणा आणि नंतरचा घटनाक्रम दिसत आहे.
व्हिडीओ तयार करणाऱ्याने सोशल मीडियावर अपलोड करताना व्हिडीओ फाइल पोलिसांना टॅग केली होती. पोलिसांनी व्हिडीओ फाइल बघून तपास केला. तपासात व्हिडीओतील माहिती खरी असल्याचे आढळले यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
मुस्तकीम आणि नईम या दोघांना पोलिसांनी अटक केली. गावकरीही मुस्तकीम आणि नईमवर नाराज आहेत. याआधीही मुद्दाम सामाजिक सौहार्द बिघडविण्यासाठी काही कृत्य करण्याचे प्रकार गावात घडले होते. यामुळे ताज्या घटनेअंती पोलिसांनी केलेल्या कारवाईचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.
याआधी मार्चमध्ये डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे उमेदवार सय्यदा खातून यांचा विजय झाल्यानंतर 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा देण्यात आल्याचे उघड झाले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. घोषणा देणाऱ्यांना अटक करण्यात आली होती.