साहेब, माझी बायको भोळ्याभाबड्या लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवते, तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला पती आणि..

नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस स्टेशनला एकाने आपली व्यथा सांगितली. त्याच्या पत्नीची वागणूक चांगली नसल्याचं त्याचं म्हणणं आहे, तिने आतापर्यंत अनेकांना हनीट्रॅपचा शिकार बनवलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पीडितेच्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे.

My wife traps innocents  people in honeytrap the husband who reached the police station with a complaint 
साहेब... माझी बायको भोळ्याभाबड्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवते  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस स्टेशनला एका तरुणाने आपली व्यथा सांगितली
  • पत्नीची वागणूक चांगली नसल्याचं तरुणाचं म्हणणं आहे,
  • आतापर्यंत अनेकांना हनीट्रॅपचा शिकार बनवलं आहे

नोएडा : साहेब... माझी बायको भोळ्याभाबड्या लोकांना जाळ्यात अडकवते आणि नंतर ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळते. होय... नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस स्टेशनला एकाने आपली व्यथा मांडली. पत्नीची वागणूक चांगली नसल्याचं त्याचं म्हणणं आहे, तिने आतापर्यंत अनेकांना हनीट्रॅपचा शिकार बनवलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पीडितेच्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (My wife traps innocents  people in honeytrap the husband who reached the police station with a complaint )

दोघांची भेट एका डेटिंग अॅपद्वारे

हे प्रकरण नोएडा जिल्ह्यातील सेक्टर 49 पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या डीसीपी वृंदा शुक्ला यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की, सेक्टर 41 मध्ये राहणारे दीपक कुमार यांनी त्यांच्या पत्नीविरोधात तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. दीपक कुमारने दिलेल्या जबानीमध्ये दोघांची भेट एका डेटिंग अॅपद्वारे झाल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं आणि तरुणीने त्याला भेटण्यासाठी ओखला येथे बोलावले होते.

पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा आरोप

भेटीदरम्यान दोघांमध्ये परस्पर सहमतीचे नाते निर्माण झाले. त्यानंतर आपल्याला ब्लॅकमेल करण्यात येऊ लागल्याचा आरोपही दीपकने केला आहे. पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा आरोप लावण्याची धमकीही देण्यात आली. त्यानंतर दीपकने दबाव आणून त्या मुलीशी लग्न केले आणि दोघेही एकत्र राहू लागले. दरम्यान, त्याला समजले की त्याची पत्नी आधीच विवाहित आहे आणि ती सोशल मीडियावर स्वतःला अविवाहित असल्याचे सांगते. इतकंच नाही तर डेटिंग अॅपच्या माध्यमातून ती नवीन मुलांशी मैत्री करते आणि त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करते.

टोळीने कॅफे आणि खोल्या भाड्याने घेतल्या

महिलांच्या या टोळीत आणखी अनेक जण सामील असल्याचे सांगितले. तिने सांगितले की, याशिवाय नोएडाच्या सेक्टर-20 कोतवालीमध्येही दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपकने पोलिसांना सांगितले की, त्याच्या टोळीने काही ठिकाणी कॅफे आणि खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. त्यांच्याकडे संपूर्ण यंत्रणा आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनच अश्लिल फोटो आणि व्हिडिओ बनवले जातात. मग त्याच आधारे त्यांना ब्लॅकमेल केले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी