म्यानमारच्या सेंट्रल बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरवर गोळीबार

Myanmar Central Bank Vice-Governor Shot at Her Home in Yangon : म्यानमारच्या सेंट्रल बँकेच्या (शिखर बँक) डेप्युटी गव्हर्नरवर दोन मारेकऱ्यांनी घरात घुसून गोळीबार केला.

Myanmar Central Bank Vice-Governor Shot at Her Home in Yangon
म्यानमारच्या सेंट्रल बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरवर गोळीबार 
थोडं पण कामाचं
  • म्यानमारच्या सेंट्रल बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरवर गोळीबार
  • ५५ वर्षांच्या डाउ थान थान स्वे यांना अतिशय जवळून ३ गोळ्या लागल्या
  • दोन मारेकऱ्यांनी घरात घुसून केला गोळीबार

Myanmar Central Bank Vice-Governor Shot at Her Home in Yangon : यंगून : म्यानमारच्या सेंट्रल बँकेच्या (शिखर बँक) डेप्युटी गव्हर्नरवर दोन मारेकऱ्यांनी घरात घुसून गोळीबार केला. गोळीबारात डेप्युटी गव्हर्नर जखमी झाले. त्यांना तीन गोळ्या लागल्या.

म्यानमारच्या सर्व बँकांना त्यांच्याकडे असलेल्या विदेशी चलनाचा साठा शिखर बँकेत जमा करून त्या बदल्यात विनिमयाच्या दरानुसार क्यात हे म्यानमारचे चलन स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा आदेश देऊन आठवडा होत नाही तोच डेप्युटी गव्हर्नरवर गोळीबार झाला. 

म्यानमारमध्ये लष्करशाही सुरू आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी थान थान स्वे यांना म्यानमारच्या सेंट्रल बँकेच्या (शिखर बँक) डेप्युटी गव्हर्नर पदावर नियुक्त केले. यामुळे डेप्युटी गव्हर्नरवर गोळीबार करून मारेकऱ्यांनी थेट लष्करशाहीलाच आव्हान दिल्याची चर्चा म्यानमारमध्ये सुरू आहे. 

निवडणुकीत बहुमत मिळविणाऱ्या आंग सान सू यांचे सरकार फेब्रुवारी २०२१ मध्ये विसर्जित करून लष्कराने म्यानमारमध्ये लष्करशाही सुरू केली. यानंतर लष्कराने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सेंट्रल बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डाउ थान थान स्वे (Daw Than Than Swe) यांना प्रचंड महत्त्व होते. यामुळे लष्करशाहीला विरोध करण्यासाठी डाउ थान थान स्वे यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

म्यानमारच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ५५ वर्षांच्या डाउ थान थान स्वे यांना अतिशय जवळून ३ गोळ्या लागल्या आहेत. या गोळ्या दोन मारेकऱ्यांनी मारल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी