रहस्यमय मृत्यू! घरात आढळले पती, पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह 

 दिल्लीतील भजनपुरा भागात एका कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह आढळले आहेत. सर्व मृतदेह घराच्या आत बंद होते. 

  mysterious deaths in delhi the bodies of husband wife and three children found at home in bhajanpura crime news in marathi tcrim 34
 रहस्यमय मृत्यू! घरात आढळले पती, पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह   |  फोटो सौजन्य: Representative Image

 नवी दिल्ली :  पूर्वोत्तर दिल्लीच्या भजनपुरा भागात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. त्याचे मृतदेह सापडले आहे. ते सर्व बंद घरात मृतावस्थेत आढळले आहेत.  पोलिसांनी सांगितले की मृत व्यक्तींची ओळख पटली असून यात ई-रिक्षा चालवणारा ४५ वर्षी शंभू, त्याची पत्नी आणि ती मुलांचा समावेश आहे. डीसीपी वेद प्रकाश सूर्या यांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार मुलांचे वय १२, १४ आणि १८ वर्ष आहेत. 
 
 शेजारी राहणाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस घटना स्थळी पोहचली, त्यावेळी घरात प्रवेश केल्यावर दिसले की मृतदेह सडलेले होते. 
 
 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित परिवाराचा मृत्यू सहा दिवसांपूर्वी झाला असावा, त्यांचे शरीर पूर्णपणे सडलेले आहेत. घराचा एक दरवाजा आतून बंद होता, तर दुसरा बाहेरन बंद करण्यात आला होता. सूर्या यांनी सांगितले की तीन मृतदेह एका खेलीत तर इतर दोन दुसऱ्या खोलीत सापडले आहेत. 


 
 मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही नोट सापडली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...