origin of Black Death Pandemic : सातशे वर्षांपूर्वी आशियासह जगभरात आलेल्या प्लेगच्या साथीनं कोट्यवधी लोकांचे प्राण घेतले होते. जगातील 60 टक्के लोकसंख्या या रोगात गतप्राण झाल्याचं सांगितलं जात होतं. बहुतांश देशातील 50 ते 70 टक्के लोकसंख्या या रोगाला बळी पडली होती आणि जगाची लोकसंख्या या रोगाने झपाट्याने घटली होती. या प्लेगच्या साथीत लोकांचे अवयव गँगरिन झाल्याप्रमाणे काळे पडत असत. त्यामुळे या प्लेगच्या साथीला ‘ब्लॅक डेथ पँडेमिक’ असं नाव पडलं होतं. या रोगाने जगभरातील 200 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.
आशियातील कझाकिस्तानमध्ये या रोगाच्या मूळ विषाणूबद्दल काही मूलभूत माहिती समोर आली आहे. कझागिस्तानमध्ये नुकतीच तीन पुरातन थडगी सापडली आहेत. 700 वर्षांपूर्वी या साथीने मरण पावलेल्या तीन महिलांची ही थडगी आहेत. त्यांच्या दातांचा डीएनए शोधल्यानंतर त्यावेळी ज्या बॅक्टेरियामुळे मृत्यूच्या काळ्या पर्वाला सुरुवात झाली असू शकते, त्याचा शोध लागण्याची शक्यता असल्याचा दावा शास्त्रज्ञ करत आहेत. प्लेगची ही साथ 1346 ते 1353 या कालावधीत आली होती. ज्या तीन महिलांची थडगी वैज्ञानिकांना सापडली आहेत, त्यांना 1338 ते 1339 साली दफन करण्यात आलं होतं, असा अंदाज आहे. त्यामुळे साथीनं भीषण स्वरूप धारण करण्याअगोदर काही वर्ष त्याच विषाणूची लागण होऊन या महिलांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
अधिक वाचा - IAS Success Story: आधी आयपीएस झाली मात्र पुन्हा दिली परीक्षा, नम्रता जैन झाली आयएएस...एका टॉपरची कहाणी
साथीच्या काळात मरण पावलेल्या अनेक व्यक्तींची थडगी यापूर्वीही शास्त्रज्ञांना सापडली होती. मात्र सध्या सापडलेली तीन थडगी ही अधिक महत्त्वाची असल्याचं मानलं जात आहे. प्लेगच्या विषाणूचं मूळ शोधण्यासाठी या थडग्यांचा उपयोग होणार आहे. ही तिन्ही थडगी अशा काळातील आहे, जेव्हा प्लेगचा हा विषाणू मूळ धरत होता. त्यामुळे त्याच्या निर्मितीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील अवस्था या थडग्यांच्या डीएनएमधून शास्त्रज्ञ शोधू शकणार आहेत. आतापर्यंत या साथीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नोंदी या 1346 सालानंतरच्या आहेत. मात्र पहिल्यांदाच 1338 सालच्या मृत्यूची नोंद शास्त्रज्ञांना कझाकिस्तानमध्ये मिळाली आहे.
अधिक वाचा - Rahul Gandhi ED Enquiry : रेणुका चौधरींनी पकडली पोलिसाची कॉलर, कारणाचाही केला खुलासा, गुन्हा दाखल
साधारण सातशे वर्षांपूर्वी ही साथ भूमध्य सागरात व्यापार करणाऱ्या देशांमध्ये वेगाने पसरली होती. ‘सिल्क रुट’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मार्गावर जिथे जिथे लोक व्यापारानिमित्त एकत्र येत होते, त्यांच्या माध्यमातून हा विषाणू एका देशातून दुसऱ्या देशात पसरत गेला आणि मृत्यूचं तांडव जगानं पाहिलं होतं. सध्यादेखील प्लेगचा विषाणू अस्तित्वात असून त्याचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र या विषाणूच्या मुळाचा शोध लागला, तर त्यााबाबत अधिक सखोल माहिती मिळवणं शास्त्रज्ञांना शक्य होणार आहे.