गळा, तोंड दाबून माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची हत्या, पोलिसांकडून पत्नीची चौकशी

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 20, 2019 | 12:51 IST | टाइम्स नाऊ हिंदी

उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित तिवारी यांच्या हत्येची पोलीस आणि क्राइम ब्रांच कसून चौकशी करत आहेत.

rohit tiwari
रोहित तिवारीची हत्या  |  फोटो सौजन्य: PTI

नवी दिल्ली: उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर यांच्या मृत्यू प्रकरणी क्राईम ब्रांन्च कसून चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झालं आहे की, हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असू शकते. अहवालानुसार रोहितचा नाक, गळा आणि तोंड दाबल्यानं गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एम्समध्ये झालेल्या शव विच्छेदनानंतर पोलिसांनी गुरूवारीच हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच हे प्रकरण क्राईम ब्रांन्चकडे सोपवण्यात आलं आहे. क्राईम ब्रॅान्च आज रोहित शेखरच्या पत्नीची चौकशी करणार आहे. 

बातमी तर अशीही आहे की, रोहितच्या मानेवर बोटांचे ठसेही सापडले आहेत. रोहित शेखर तिवारीचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यांना दक्षिण दिल्लीच्या साकेतमधील मॅक्स रुग्णालयात पाच वाजता आणलं गेलं. तिथंच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पाच डॉक्टरांच्या टिमनं त्यांचं शव विच्छेदन केलं तेव्हा हे उघड झालं की, हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्येचं प्रकरण असू शकतं.

एनबीटीच्या म्हणण्यानुसार, घरामध्ये पाच सीसीटीव्ही कॅमेरा होते. ज्यातील एकामध्ये रोहित शेखर रात्री नशेमध्ये जिना चढतांना दिसले. त्यांची हत्या घरातील व्यक्तींनीच केली असंही म्हटलं जात आहे. नोकरांसह अनेक नातेवाईकांवर पोलिसांची संशयाची सुई आहे. रोहित शेखर यांच्या छातीच्यावरचा भाग निळा पडलेला आढळला, तसंच दोन्ही खांद्यांवरही काळे डाग आहे. ज्यावरून असेही तर्क काढले जात आहेत की त्यांना विषही देण्यात आलेलं आहे.

एनबीटीच्या रिपोर्टनुसार, शवविच्छेदन अहवालात रोहित यांचं हृदय लहान झाल्याचं सांगितलं आहे आणि छातीच्या वरील भाग निळा पडलेला आहे. पण नातेवाईकांनी सांगितलं होतं की त्यांचा मृत्यू हृदय विकाराचा झटका आल्यानं झालेला आहे. घरातील नोकरांपासून नातेवाईकांपर्यंत सर्वांनी दिलेल्या स्टटमेंटमध्ये विरोधाभास आढळत आहे. या हत्येचं कारण मालमत्ता वादपासून सर्व प्रकारच्या कारणांचा क्राईम ब्रान्च तपास करत आहे.  

बंगल्यातील ज्या खोलीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तिथं खूप रक्त सांडलेलं होतं, असं पोलिसांच्या निदर्शनात आलं. तसंच तिथं रक्तानं भरलेले टिश्यू पेपर्स आणि उश्या सापडल्या आहेत. सिंगल बेडच्या या छोट्याशा खोलीमध्ये खूप सारी औषधंही ठेवलेली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
गळा, तोंड दाबून माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची हत्या, पोलिसांकडून पत्नीची चौकशी Description: उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित तिवारी यांच्या हत्येची पोलीस आणि क्राइम ब्रांच कसून चौकशी करत आहेत.
Loading...
Loading...
Loading...