Nagaland Election Results 2023 Republican Party Of India Ramdas Athawale Won 2 Seats : रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) नागालँडमध्ये झेंडा फडकावला. नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर- 2 मतदारसंघात इम्तिचोबा आणि नोकसेन मतदारसंघात वाय. लिमा ओनेन चँग हे 2 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) उमेदवार विजयी झाले. हा विजय पक्षाने देशभर जल्लोष करून साजरा केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उमेदवारांनी नागालँडमध्ये 8 विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यापैकी 2 जागांवर पक्षाला विजय मिळवला.
नागालँडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) भाजप एनडीपीपी या युतीला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. नागालँड सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पक्षाच्यावतीने रामदास आठवले भाजपशी चर्चा करणार आहेत.
झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?
चाणक्य निती : पत्नी पतीपासून या गोष्टी लपवून ठेवते
घरातल्या झुरळांचा बंदोबस्त करण्याचे सोपे प्रभावी उपाय