Donald Trump: वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्पीकर नॅन्सी पेलोसी (US Congress Speaker Nancy Pelosi) यांच्या तैवान दौऱ्यावर भाष्य केले आहे. यावेळी ट्रम्प यांनी पेलोसीवर हल्ला करणे सुरूच ठेवले. पेलोसी यांच्या तैवान (Taiwan) भेटीनंतर चीन (China) संतापला आहे. एकीकडे रिपब्लिकन पक्षाचे इतर नेते पेलोसी यांना पाठिंबा देत आहेत. तर ट्रम्प यांनी मात्र पेलेसी यांचं हे वागणं म्हणजे वेडेपणा असल्याचं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. या भेटीवर ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया साइट ट्रुथ यावर प्रतिक्रिया दिली आहे
नॅन्सी वेड्या आहेत, ट्रम्प यांची टीका
ट्रम्प यांनी असं लिहिलं आहे की, 'ही वेडी नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये काय करत आहे? ही नेहमीच अडचणी निर्माण करते. तिला काहीही नीट करता येत नाही. तिच्याकडून महाभियोगाचे दोन प्रयत्नही चांगले झाले नव्हते.'
पेलोसी मंगळवारी रात्री 10.30 वाजता तैवानमध्ये दाखल झाल्या. २५ वर्षांनंतर तैवानला भेट देणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन स्पीकर आहेत. ट्रम्प आणि पेलोसी कधीच एकमेकांशी संबंधित नव्हते.
ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष होते की, ज्यांच्यावर दोनदा महाभियोग चालविण्यात आला. रिपब्लिकन पक्षाने नेहमीच पेलोसीला विरोध केला आहे. परंतु ते त्यांच्या तैवान भेटीला मात्र समर्थन देत असल्याचे दिसून आले. सिनेट अल्पसंख्याक नेते मिच मॅककोनेल, 25 इतर सिनेट रिपब्लिकनसमवेत, पेलोसीच्या तैवान भेटीसाठी त्यांचे कौतुक करणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या टीकेवर पेलोसी यांच्या प्रवक्त्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अधिक वाचा: Ayman al-Zawahiri: शेवटच्या क्षणी काय करत अल-जवाहिरी?, अमेरिकन अधिकाऱ्यानं सांगितला संपूर्ण घटनाक्रम
संसदेला केले संबोधित
चीनच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून पेलोसी या तैवानमध्ये पोहोचल्या आणि तिथल्या संसदेला संबोधित केले. शोंगशान विमानतळावर पेलोसीचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले ते चीनला एक प्रकारे डिवचण्यासारखेच होते. बुधवारी, पेलोसी यांनी तैवानच्या संसदेतून जिनपिंग यांना स्पष्ट संदेश दिला की, अमेरिकेने 43 वर्षांपूर्वी तैवानसोबत उभे राहण्याच्या आपल्या वचनावर आजही ठाम आहे.
अधिक वाचा:
संसदेला संबोधित करण्यापूर्वी पेलोसीने ट्विट केले होते की, पेलोसी यांना तैवानमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. पेलोसीने तैवानला दूरदर्शी लोकशाही देखील म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, तैवानने जगाला आशा, धैर्य आणि विश्वास दिला आहे जे आव्हाने असूनही शांततापूर्ण आणि समृद्ध देश निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.