नॅन्सी पेलोसी तैवानचा दौरा करून परतल्या, चीनचा थयथयाट

Nancy Pelosi meets Tsai Ing-wen : अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला.

Nancy Pelosi meets Tsai Ing-wen
नॅन्सी पेलोसी तैवानचा दौरा करून परतल्या, चीनचा थयथयाट 
थोडं पण कामाचं
  • नॅन्सी पेलोसी तैवानचा दौरा करून परतल्या
  • नॅन्सी पेलोसींच्या तैवान दौऱ्यामुळे नाराज चीनने केल्या लष्करी कवायती
  • तैवानच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध

Nancy Pelosi meets Tsai Ing-wen : अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला. पेलोसी यांनी तैवानच्या अध्यक्षांची भेट घेतली तसेच तैवानच्या संसदेत विशेष भाषण केले. विशेष म्हणजे तैवानमध्ये तिबेटच्या दूतावासाला भेट दिली आणि तिबेटच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. नॅन्सी पेलोसी यांच्या या दौऱ्यावरून चीनने थयथयाट सुरू केला आहे.  

नॅन्सी पेलोसींच्या तैवान दौऱ्यामुळे नाराज झालेल्या चीनने तैवान जवळ सहा ठिकाणी लष्करी कवायती केल्या. चीनमधून तैवानला होणारी वाळूची निर्यात रोखून धरली. तसेच तैवानमधून आयात केल्या जाणाऱ्या निवडक वस्तूंवर बंदी चीनमध्ये बंदी लागू केली.

तैवान दौऱ्यावर असताना पेलोसी यांनी चीनला स्पष्ट संदेश दिला. जगाला लोकशाही आणि हुकुमशाही यातून एका पर्यायाची नवड करायची आहे. अमेरिका तैवानच्या लोकशाहीसोबत ठामपणे उभी आहे, असे पेलोसी म्हणाल्या. तैवान येणाऱ्या आव्हानांशी लढत आणि परिस्थितीतून मार्ग काढत लोकशाही मार्गाने प्रगती करत आहे. यातून तैवानचे धाडस, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द दिसून येते असे पेलोसी म्हणाल्या. 

तैवानसोबत अमेरिकेची मैत्री आहे. तैवानच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे, असे पेलोसी म्हणाल्या. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे तैवानच्या संरक्षणाचा मुद्दे एकदम प्रकाशात आला आहे. अमेरिका तैवानच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी पूर्ण सामर्थ्यानिशी ठामपणे उभी आहे, असे पेलोसी म्हणाल्या. त्यांनी तैवानने केलेल्या पाहुणचारासाठी जाहीर आभार मानले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी