narayan rane : महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळले, शरद पवार दिल्लीत; राणे म्हणाले, 'मार्चपर्यंत भाजपचे सरकार'

narayan rane on bjp govt । नारायण राणे यांनी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

narayan rane claims bjp will form government on coming march and  sharad pawar travelling urgent to delhi
राणे म्हणाले, 'मार्चपर्यंत भाजपचे सरकार'  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही तासांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आणि चंद्रकांत पाटील यांच्यानंतर शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.
  • नारायण राणे यांनी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्याचे वक्तव्य केले आहे.

Narayan Rane on BJP Form Govt in Maharashtra । जयपूरः  गेल्या काही तासांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आणि चंद्रकांत पाटील यांच्यानंतर शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. दुसरीकडे, नारायण राणे यांनी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (narayan rane claims bjp will form government on coming march and  sharad pawar travelling urgent to delhi)

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल. आता सर्व काही ठीक होईल, असे नारायण राणे वक्तव्य केल्याने  सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  राणे सध्या जयपूरमध्ये आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवर आपले सर्व कार्यक्रम रद्द करून आज दुपारी दिल्लीत पोहोचत आहेत. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सोबतच मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहेत. दुसरीकडे, भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आज सकाळीच दिल्लीत पोहोचले आहेत.

महाराष्ट्र भाजपचे अनेक नेतेही कालपासूनच दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कालच भेट घेतली. त्या बैठकीला देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार होते. मात्र, ते उशिरा दिल्लीत पोहोचले. सध्या भाजप मुख्यालयात चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस संघटनमंत्री बी. एल. संतोष यांची भेट घेत आहेत.

या वृत्ताशी संबंधित सूत्रांकडून आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेते संजय राऊत यांची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली, असं बोललं जातंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी